WI Vs IND: अखेरच्या षटकात 15 धावा रोखण्याचं आव्हान, दोन आक्रमक फलंदाज क्रिजवर; त्यांनाही पुरून उरला मोहम्मद सिराज!
WI vs IND 1st ODI: भारतीय संघानं वेस्ट इंडिज (West Indies vs India) दौऱ्याची सुरुवात विजयानं केली.
![WI Vs IND: अखेरच्या षटकात 15 धावा रोखण्याचं आव्हान, दोन आक्रमक फलंदाज क्रिजवर; त्यांनाही पुरून उरला मोहम्मद सिराज! WI vs IND 1st ODI: Mohammad Siraj had 15 to defend in the final over WI Vs IND: अखेरच्या षटकात 15 धावा रोखण्याचं आव्हान, दोन आक्रमक फलंदाज क्रिजवर; त्यांनाही पुरून उरला मोहम्मद सिराज!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/23/b115a63e2ee0b40fb89de8f0cf4b1bb51658556044_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
WI vs IND 1st ODI: भारतीय संघानं वेस्ट इंडिज (West Indies vs India) दौऱ्याची सुरुवात विजयानं केली. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघानं वेस्ट इंडिजचा 3 धावांनी पराभव केलाय. भारताच्या विजयात कर्णधार शिखर धवनसह (Shikhar Dhawan) वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) आणि विकेटकिपर संजू सॅमसननंही (Sanju Samson) मोलाचा वाटा उचलला. या सामन्यात 97 धावांची खेळी करणाऱ्या शिखर धवनला सामनावीरचा पुरस्कार मिळालाय. पण या सामन्यातील अखेरच्या षटकात वेस्ट इंडीजच्या संघाला 15 धावांची आवश्यकता असताना मोहम्मद सिराज आणि संजू सॅमसननं दमदार कामगिरी करत सामना भारताच्या बाजूनं झुकवला.
भारतानं दिलेल्या309 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडीजच्या संघानं 49 षटकात 6 विकेट्स गमावून 294 धावा केल्या. अखेरच्या षटकात वेस्ट इंडीजला विजयासाठी 15 धावांची आवश्यकता होती. त्यावेळी शिखर धवननं मोहम्मद सिराजकडं चेंडू सोपावला. शिखर धवनं दाखवलेल्या विश्वासाला मोहम्मद सिराज खरा उतरला. त्यानं अखेरच्या षटकात 11 धावा देऊन भारताला 3 धावांनी विजय मिळवून दिला.
वेस्ट इंडीजविरुद्ध मोहम्मद सिराज अखरेचं षटक
या षटकातील पहिला चेंडू मोहम्मद सिराजनं निर्धाव टाकला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूत 1 धाव दिली, तिसऱ्या चेंडूवर चौकार लागल्यानंतर चौथ्या चेंडूवर दोन धावा दिल्या. पाचवा चेंडू वाईड टाकल्यानंतर मोहम्मद सिराजनं एक धाव दिली. तसेच या षटकातील अखरेच्या चेंडूवर एक धाव देऊन भारताला विजय मिळवून दिला. या षटकात संजू सॅमसननं डाईव्ह मारून भारतासाठी एक चौकार वाचवलाय.
रोमहर्षक सामन्यात भारताचा 3 धावांनी विजय
या सामन्यात वेस्ट इंडीजच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करत भारतानं 50 षटकात 7 विकेट्स गमावून 308 धावा केल्या. वेस्ट इंडीजकडून अल्झारी जोसेफ आणि गुडाकेश मोटी यांना प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. तर, रोमॅरियो शेफर्ड आणि अकेल होसेन यांना एक-एक विकेट्स मिळाली. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडीजच्या संघानं भारताला कडवी झुंज दिली. परंतु, त्यांना तीन धावांनी पराभव स्वीकारावा लागलाय. वेस्ट इंडीजच्या संघानं 50 षटकात 6 विकेट्स गमावून 305 धावा केल्या. भारताकडून मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि युजवेंद्र चहलनं प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)