(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Afghanistan crisis : जेव्हा मंत्री Food Delivery करतात....
एका देशाचा मंत्री असणारा व्यक्ती जेव्हा डिलिव्हरी बॉय होतो... म्हणजे तालिबान्यांनी कब्जा मिळवला आणि अफगाणिस्तानचं संपूर्ण चित्रच पालटलं. अफगाणिस्तानातील एका मंत्र्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. ते म्हणजे सय्यद अहमद शाह सआदत... अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घनी यांच्या सरकारमध्ये सआदत यांच्याकडे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रीपदाची जबाबदारी होती. पण अफगाणिस्तानातील तालिबान्यांचं वाढतं वर्चस्व पाहता डिसेंबर २०२० मध्ये सआदत यांनी देश सोडला... आणि जर्मनीतील लेपझिग येथे ते निर्वासित म्हणून राहू लागले. अफगाणिस्तानातील त्यांचं स्टेटस जरी मंत्र्यांचं असलं तरी जर्मनीत ते साधे निर्वासित आहेत. दोन वेळच्या पोटापाण्यासाठी ते ((हे मंत्रीमहोदय जर्मनीत)) फूड डिलिव्हरीचं काम करताहेत. यावेळी ग्राहकाला पिझ्झा देण्यासाठी जात असताना एका स्थानिक पत्रकाराने त्यांचे फोटो काढलेत. आणि हे फोटो आता सोशल मीडियावरही चांगलेच व्हायरल झालेत. ‘स्काय न्यूज अरेबिया’ या वृत्तवाहिनीशी बोलताना सआदत यांनी व्हायरल झालेले फोटो आपलेच असल्याचे मान्य केले.