(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ajit Pawar In Wari Baramati : पालखी सोहळ्यात अजितदादा सहभागी; हाती टाळ, मुखी माऊलींचा जयघोष
Ajit Pawar In Wari Baramati : पालखी सोहळ्यात अजितदादा सहभागी; हाती टाळ, मुखी माऊलींचा जयघोष राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि देशातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बारामतीत आता पवार कुटुंबातच दोन गट पडले आहेत. लोकसभा निवडणुकांपूर्वीच बारामतीमधील राजकारण दोन गटांत विभागल्याचं पाहायला मिळालं. मात्र, बारामतीकरांना काकांच्या पारड्यात वजन टाकत लोकसभा निवडणुकीत बारामतीकर हे शरद पवारांच्या (Sharad Pawar) बाजुने असल्याचं दाखवून दिलं. त्यानंतर, आता आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी सर्वच राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहे. त्यातच, यंदाच्या पंढरीतील आषाढी वारी (Pandharichi wari) उत्सवातही राजकीय रंग पाहायला मिळत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेतेमंडळी वारीत सहभागी होऊन वारकऱ्यांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, बारामती (Baramati) ही राजकारणाची पंढरी असल्याचा दावा करत बारामतीमध्ये फलक झळकावले आहेत. देशाच्या राजकारणात एकट्या बारामतीचे तीन खासदार आहेत, तर राज्याच्या विधानसभेत दोन आमदार हे बारामतीचेच आहेत. तसेच, राज्याचं राजकारण हे नेहमीच बारामतीच्या अवतीभोवती म्हणजे शरद पवारांच्या केंद्रस्थानी असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे, बारामतीच्या राजकीय घडामोडी देशात चर्चेत असतात. आता, पवार कुटुंबात राजकीय फूट पडल्यानंतर येथील स्थानिक राजकारण बदललं आहे. मात्र, वारीच्या पालखी सोहळ्यानिमित्त पवार कुटुंबांतील राजकीय नेत्यांचा एकत्रित बॅनर झळकला आहे. सध्या सोशल मीडियासह बारामतीमध्ये या बॅनरची चांगलीच चर्चा आहे.