एक्स्प्लोर

मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल

दिग्दर्शक रामगोपाल वर्मा सध्या 'सत्या' सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यक्त असून सत्या सिनेमाची सिनेसृष्टीत जोरदार चर्चा आहे

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रामगोपाल वर्माला (Ram gopal varma) 3 महिन्यांच्या तुरुंगावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दिग्दर्शकाने 2018 साली एका चित्रपटाच्या आर्थिक व्यवहाराशी संदर्भाने चेक बाऊंस झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी, आता जवळपास 7 वर्षांनी न्यायालयात (Court) अंतिम सुनावणी झाली असू आरोपी रामगोपाल वर्माला दोषी ठरवण्यात आलं आहे. या सुनावणीवेळी आरोपी दिग्दर्शक वर्मा न्यायालयात हजर नव्हता. आपल्या वादग्रस्त वक्तव्याने व ट्विटमुळे चर्चेत असलेल्या रामगोपाल वर्मा यांच्याविरुद्ध 2018 साली श्री नावाच्या कंपनीने फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये, रामगोपाल वर्माला दोषी ठरवून न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे उद्या रामगोपाल वर्माकडून 'सिंडिकेट' या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात येणार आहे.   

दिग्दर्शक रामगोपाल वर्मा सध्या 'सत्या' सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यक्त असून सत्या सिनेमाची सिनेसृष्टीत जोरदार चर्चा आहे. मात्र, त्याच दरम्यान, 7 वर्षांपूर्वीच्या एका चेक बाऊंस प्रकरणात न्यायालयाने रामगोपाल वर्माला तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.  21 जानेवारी रोजी रामगोपाल वर्माला न्यायालयात सुनावणीसाठी बोलवण्यात आले होते, मात्र ते हजर राहिले नाहीत. त्यानंतर, न्यायालयाने फिर्यादीला 3.72 लाख रुपये मोबदला म्हणून देण्याचे निर्देश दिले. न्यायालयाने निगोशिएबल इंस्ट्रूमेंट्स अॅक्टच्या कलम 138 अन्वये आरोप ठेवत आरोपीला दोषी ठरवले आहे. त्यामध्ये, 3 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. 

अंधेरी सत्र न्यायालयात गेल्या 7 वर्षांपासून हा खटला सुरू असून रामगोपाल वर्माविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटही जारी करण्यात आलं आहे. याप्रकरणातील अंतिम सुनावणीवेळ आरोपी न्यायालयात हजर नसल्याने त्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केलं पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले. तसेच, संबंधित पोलीस स्टेशनमध्ये आरोपीला अटक केली पाहिजे आणि तक्रारदारास पुढील तीन महिन्यात 3 लाख 72 हजार रुपयांची रक्कम देण्यात यावी, असे निर्देशच न्यायालयाने दिले आहेत. तसेच, तीन महिन्यात 3 लाख 72 हजार रुपये न दिल्यास आरोपीला तीन महिने तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. दरम्यान, श्री कंपनीचे प्रमुख महेशचंद्र मिश्रा यांनी चेक बाऊंसप्रकरणी हा खटला दाखल केला होता. 

दिग्दर्शक आर्थिक संकटात?

दरम्यान, रामगोपाल वर्मा गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटात असल्याची चर्चा बॉलिवूड विश्वात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी कुठलाही सिनेमा बनवला नाही. मात्र, सत्या, रंगीला, कंपनी, सरकार, 26/11 यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांचे दिग्दर्शन रामगोपाल वर्मा यांनी केलं आहे. 

हेही वाचा

लाडक्या बहिणींकडून पैसे रिकव्हरी करणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar : पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
लाडक्या बहिणींकडून पैसे रिकव्हरी करणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर
लाडक्या बहिणींकडून पैसे रिकव्हरी करणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर
Raigad Guardian Minister : तटकरेंनी पाठीत पुन्हा खंजीर खुपसला; रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत वादाचा वणवा
तटकरेंनी पाठीत पुन्हा खंजीर खुपसला; रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत वादाचा वणवा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attackerसैफवरील हल्ल्यानंतर CCTV मध्ये दिसणारा माझा मुलगा नाही,आरोपीच्या वडिलांचा दावाUday Samant Mumbai : दावोस दौऱ्यावरुन उदय सामंत परतले, करारांबाबत दिली माहितीRaj Thackeray Nashik Tour : राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल, ३ दिवस दौरा, कार्यकर्त्यांशी साधणार संंवादABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 23 January 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar : पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
लाडक्या बहिणींकडून पैसे रिकव्हरी करणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर
लाडक्या बहिणींकडून पैसे रिकव्हरी करणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर
Raigad Guardian Minister : तटकरेंनी पाठीत पुन्हा खंजीर खुपसला; रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत वादाचा वणवा
तटकरेंनी पाठीत पुन्हा खंजीर खुपसला; रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत वादाचा वणवा
MUM Vs J&K Ranji Trophy : मुंबई 120 धावांवर ऑल आउट! गंभीरने चॅम्पियन ट्रॉफीतून फुली मारलेल्या पठ्ठ्याने घातला धुमाकूळ, ठोकले अर्धशतक
मुंबई 120 धावांवर ऑल आउट! गंभीरने चॅम्पियन ट्रॉफीतून फुली मारलेल्या पठ्ठ्याने घातला धुमाकूळ, ठोकले अर्धशतक
Ranji Trophy : 6 फूट 4 इंच उंचीचा कोण उमर नझीर? ज्याने एक-एक रन काढण्यासाठी रोहित शर्माला अक्षरशः रडवले, पाहा VIDEO
6 फूट 4 इंच उंचीचा कोण उमर नझीर? ज्याने एक-एक रन काढण्यासाठी रोहित शर्माला अक्षरशः रडवले, पाहा VIDEO
रेल्वे अपघातापूर्वी नातवाला व्हिडिओ कॉल, पण 10 वर्षांपासून भेट नव्हती; आजीसह कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
रेल्वे अपघातापूर्वी नातवाला व्हिडिओ कॉल, पण 10 वर्षांपासून भेट नव्हती; आजीसह कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
Rohit Pawar : शरद पवार-अजितदादा पुन्हा एकत्र येणार? रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यानं भुवया उंचावल्या!
शरद पवार-अजितदादा पुन्हा एकत्र येणार? रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यानं भुवया उंचावल्या!
Embed widget