Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा
Pandharpur News : परळीच्या राजस्थानी मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीकडून पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटींचा गंडा घातल्याचं समोर आलं आहे.
सोलापूर : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आणि खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या वाल्मिक कराड याच्यामुळे परळी राज्यात चर्चेत असतानाच आता आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन समोर आले आहे. परळीच्या राजस्थानी मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीकडून पंढरपुरातील 30 ठेवीदारांना जवळपास एक कोटीचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी राजस्थानी मल्टीस्टेट सोसायटीच्या चेअरमन, संचालकासह येथील व्यवस्थापकावर पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंढरपुरातील तक्रारदार सेवानिवृत्त शिक्षक देवेंद्र तुकाराम गोंजारी यांनी राजस्थान मल्टीस्टेट सोसायटीच्या पंढरपूर शाखेत 8 सप्टेंबर 2023 रोजी 16 लाख 99 हजार रूपयांची ठेव पावती केली होती. 24 एप्रिल 2024 रोजी ठेव पावतीची मुदत संपल्यानंतर पैसे परत मिळावे अशी मागणी शाखा व्यवस्थापक स्वप्नील कुलकर्णी यांच्याकडे मागणी केली. मात्र कुलकर्णी यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली.
वारंवार पैशाची मागणी करूनही पैसे मिळत नसल्यामुळे देवेंद्र गोंजारी यांनी सोसायटीचे चेअरमन चंदुलाल बियाणीसह संचालक, व्यवस्थापक अशा 18 जणांविरोधात पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंढरपूर शहरातील 30 लोकांच्या सुमारे 1 कोटी रूपयांच्या ठेवी परळीच्या राजस्थानी मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये आहेत. या ठेवीदारांनाही त्यांचे पैसे मिळाले नाहीत. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून इतरांचा शोध सुरू आहे.
ही बातमी वाचा: