मुंबई : अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटकं आणि मनसुख हिरण हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन वाझे यांनी एनआयएच्या कोर्टात लेटर बॉम्ब फोडला आहे. हस्तलिखित पत्रातून वाझे यांनी कोर्टापुढे जबाब नोंदवला आहे. त्यात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख आणि शिवसेना मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावर अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 
 
आज सचिन वाझे लिहिलेल्या पत्रात माझ्या नावाचा उल्लेख केला आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेत शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी वाझे यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. जून, ऑगस्ट 2020 ला वाझे यांनी SBUT ट्रस्टीकडून 50 कोटी घेण्याचा आरोप केला आहे. जानेवारी 2021 ला मी मुंबई महापालिका कंत्राटदाराकडून 2 कोटी रुपये जमा करण्याच्या सूचना दिल्या. 'या दोन्ही गोष्टी खोट्या आहेत, माझ्यावर खंडणीचे कोणतेही संस्कार नाही.', असे म्हणत  'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि माझ्या दोन्ही मुलींची शपथ घेऊन मी सांगतो की हे खोटं आहे.' 'मला बदनाम करण्यासाठी केलेले आरोप आहेत', अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली आहे.


भाजपचं षडयंत्र : अनिल परब


भाजपचे पदाधिकारी आम्ही तिसरा बळी घेऊ म्हणत होते. 'त्यामुळे भाजपने हे बनवलेलं प्रकरण आहे' 'वाझे हे पत्र देणार आहे, हे भाजपला आधीपासून माहीत होतं म्हणून ते गाजावाजा करत आहे' आजच्या पत्रात माझ्यावर, देशमुख आणि अजित पवार यांच्या जवळचे घोडावत यांच्यावर आरोप केले आहेत. माझ्यावर केलेले हे आरोप खोटे आहेत. मी आज कुठल्याही चौकशीला सामोरा जायला तयार आहे. मला चौकशीला बोलवावं मी जायला तयार आहे. CBI चौकशीचा निर्णय आला आणि आज हे पत्र आलं. परामबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांना पत्र लिहिलं त्यात हा उल्लेख नाही. आतापर्यंतच्या पत्रात कुठेही असा उल्लेख नाही. मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या लोकांना बदनांकरण्याचा हा डाव आहे. NIA ची चौकशी स्फोटकांची आहे, पण त्याचा शोध अजून लावला नाही. माझी नार्को टेस्ट केली तरी मी सामोरा जायला तयार आहे.