Uddhav Thackeray Slam Amit Shah : अमित शाहांच्या वक्तव्यांचा फडशा दसरा मेळाव्यात पाडणार
मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाकडून नवं गोंधळ गीत प्रसिद्ध करण्यात आले आहे. ठाकरे गटाचं 'सत्वर भूवरी ये' गाणं उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रसिद्ध करण्यात आले आहे. महाराष्ट्रात माजलेली अराजकता दूर करण्यासाठी देवीला साकडं घालणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच अडीच वर्षे झाले कोर्टात न्याय मिळाला नसल्याची खंत देखील उद्धव ठाकरे म्हणाले. मुंबईत आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, ही पत्रकार परिषद अराजकीय आहे . छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाच्या आधी तोतयेगिरी सुरू होती . आज एकनाथच्या नावाने तोतयेगिरी करणारे खूप आहेत. गेले दोन अडीच वर्ष न्याय मंदिराची दार ठोठावत आहोत. पण न्याय मिळत नाही आता हात दुखायाला लागले आहेत. आता जनतेच्या न्यायालयात आम्ही आलो आहोत. आता आम्ही ठरवलं जगदंबे तूच आता दार उघड... घटनाबाह्य सरकार भ्रष्टाचार करत आहे. महिलांवर अत्याचार होताय आणि मला विश्वास आहे आई आपल्यासाठी धावून येईल.
सौ सोनार की एक लोहार की... : उद्धव ठाकरे
दसरा मेळाव्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, राजकारणाबद्दल आम्ही आता दसरा मेळाव्यात बोलेल. ज्याला जे बोलायचं ते आता बोलून घेऊ दे. सगळं मी दसरा मेळाव्याला बोलेल. सौं सोनार की एक लोहार की... आजपासून नवरात्र सुरु होत आहे.सगळ्यांना शुभेच्छा.... दसऱ्याला आपण मेळाव्यात भेटणार आहोत.
या गीताविषयी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, हे गाणं ऑडिओ आहे. हे गीत श्रीरंग गोडबोले यांचे आहे. नंदेश उपम यांनी हे जगदंबेचा गाणं गायले आहे . शस्त्रक्रियेनंतर त्यांनी हे पहिले गाणं गायले आहे. तोच पहाडी आवाज त्यांचा आहे. राहुल रानडे संगीतकार आहे ते आज मुंबईत नाही.