Uddhav Thackeray PC :बांगलादेशमध्ये हिंदूंवर हल्ले होतायत, विश्वगुरु शांत का?ठाकरेंचा मोदींवर घणाघात
Uddhav Thackeray PC :बांगलादेशमध्ये हिंदूंवर हल्ले होतायत, विश्वगुरु शांत का?ठाकरेंचा मोदींवर घणाघात
Uddhav Thackeray : बांगलादेश अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू धर्मियांवर सातत्याने हल्ले (Bangladesh Violence) होत आहेत. यामुळे बांगलादेशमधील हिंदूसह संपूर्ण जगभरातील हिंदू धर्मीय चिंतेत आहेत. महाराष्ट्रात बांगलादेशच्या मुद्द्यावरून विरोधकांनी मोदी सरकारवर (Modi Government) जोरदार हल्लाबोल केलाय. आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह भाजपवर (BJP) घणाघात केलाय. उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्या देशाच्या संसदेचं अधिवेशन सुरु आहे. हे अधिवेशन किती सुरळीत सुरु आहे हे आपण पाहतोय. महत्वाचे विषय सोडून इतर विषयाला महत्व दिलं जातंय. बांगलादेशमध्ये हिंदूंवर हल्ले होत आहेत. आपण बांगलादेशसोबत क्रिकेट खेळणं कितपत योग्य आहे? बांगलादेशमध्ये इस्कॉनच्या प्रमुखाला अटक झाली, तिथे हिंदूंवर अन्याय होताय. विश्वगुरु शांत का आहेत? नरेंद्र मोदी यावर काय करणार आहेत? तुम्ही युक्रेनचा युद्ध थांबवल होतं. मग केंद्र सरकार यावर काय करणार आहे? तुम्ही काय पाऊल उचलणार आहात? असे सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.