Sanjay Shirsat vs Ravindra Dhangekar : पुणे अपघात प्रकरणात धंगेकराची स्टंटबाजी, संजय शिरसाट भडकले
पुणे: पुण्यातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या अपघातानंतर येरवाडा पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांनी धनिकपुत्राला पाठिशी घालण्यासाठी कायद्याची ऐशीतैशी केल्याचे आरोप होत आहे. प्राथमिक चौकशीत या आरोपांमध्ये काहीप्रमाणात तथ्य आढळल्याने संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना (Pune Police) निलंबित करण्यात आले आहे. पुण्यातील आणि राज्यातील बडे राजकीय नेते या संपूर्ण प्रकरणावर फारसे बोलायला तयार नाहीत. केवळ काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी हे प्रकरण लावून धरले आहे. यानंतर आता पुणे युवक काँग्रेसने चक्क राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. (Pune Car Accident)
पुणे युवक काँग्रेसने आयोजित केलेल्या या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेसाठी निवडण्यात आलेले विषय अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या स्पर्धेत प्रथम विजेत्याला 11 हजार 111 रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. 17 वर्षे 8 महिने ते 58 वर्षे वयोगटाचे नागरिक या स्पर्धेत भाग घेऊ शकतील. कल्याणीनगर परिसरात बॉलर पबसमोर रविवारी सकाळी ही निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आमदार रविंद्र धंगेकर यांच्या हस्ते या स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिक देण्यात येईल. या स्पर्धेची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. आता पुणेकर या स्पर्धेला कितपत प्रतिसाद देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
निबंध स्पर्धेचे विषय खालीलप्रमाणे
* माझी आवडती कार ( पॉर्शे ,फरारी,मर्सिडीज,)
* दारूचे दुष्परिणाम
* माझा बाप बिल्डर असता तर?
* मी खरंच पोलीस अधिकारी झालो तर?
* अश्विनी आणि अनिशचे मारेकरी कोण?
![Devendra Fadnavis : आपल्या मनातील भीतीवर विजय मिळवता आला पाहिजे, देवेंद्र फडणवीसांचा कानमंत्र](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/10/edc2b5a6f1d722f95dab078ce119b4411739175659304976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 10 February 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/10/d32c255da7d1555759992b7fdc14255e1739174450904976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Devendra Fadnavis : अश्लीलतेचे पण काही नियम असतात... समय रैना-अल्लाहबादियावर फडणवीसांची प्रतिक्रिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/10/fc8bc4fe7d07fb7c490ff784ae244bde1739174038884976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Devgad Hapus In Sangli : सांगलीच्या फळ मार्केटमध्ये देवगड हापूस आंबा दाखल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/10/9d736dc34b21c50c279536942dca2f891739172773093976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Raju Shetti On Supreme Court : न्यायाधीशांनी 3 टप्प्यांत पगार घ्यावा,FRPच्या मुद्यावरुन आक्रमक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/10/bc83f3747f7c1180ccad7c6f78638e5f1739172008304976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)