Rishabh Pant : यष्टीरक्षक - फलंदाज रिषभ पंत IPL साठी फिट
Rishabh Pant : यष्टीरक्षक - फलंदाज रिषभ पंत IPL साठी फिट कार अपघातातून सावरलेला भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत यंदाच्या आयपीएल मोसमात दिल्ली कॅपिटल्सचं प्रतिनिधित्व करू शकणार आहे. तो आयपीएलच्या मोसमात यष्टिरक्षण करण्यासाठी तंदुरुस्त असल्याची घोषणा बीसीसीआयच्या फिटनेस आणि वैद्यकीय पथकानं केली आहे. उत्तराखंडमधल्या रूरकीनजिक ३० डिसेंबर २०२२ रोजी झालेल्या कार अपघातात रिषभ पंत गंभीररित्या जायबंदी झाला होता. तब्बल १४ महिन्यांच्या उपचारांनंतर तो फलंदाज म्हणून पुनरागमनासाठी सज्ज झाला होता. पण आता बीसीसीआयनं पंत हा यष्टिरक्षणासाठीही तंदुरुस्त असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळं दिल्ली कॅपिटल्सला मोठा दिलासा मिळाला आहे. तसंच ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकासाठीही रिषभ पंत आता संघनिवडीच्या शर्यतीत दाखल होऊ शकेल. दरम्यान, मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा हे दोघंही त्यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेतून अजूनही सावरलेले नाहीत. त्यामुळं बीसीसीआयनं त्यांना आयपीएलमध्ये खेळण्यास मनाई केली आहे.