Devendra Fadnavis Oath Ceremony : बाप्पाला मोदकांचा प्रसाद, शपथविधी आधी फडणवीस सिद्धिविनायक दर्शनाला
Devendra Fadnavis Oath Ceremony : बाप्पाला मोदकांचा प्रसाद, शपथविधी आधी फडणवीस सिद्धिविनायक दर्शनाला
Devendra Fadnavis: राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांची ओळख चाणक्य म्हणून आहे. त्यांच्या राजकीय कौशल्यामुळेच आज भाजपला ऐतिहासिक विजय मिळाला असं मानलं जातं. मात्र याच देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात स्वतःच्या चंद्रपूर जिल्ह्यातील मूळ गावापासून केली आहे.त्यांच्या काकू शोभाताई फडणवीस या 1990 च्या विधानसभा निवडणुकीत मूल-सावली मतदारसंघातून भाजपकडून उभ्या होत्या. त्यांच्या पूर्ण निवडणूक प्रचाराची धुरा ही देवेंद्र फडणवीस यांनी सांभाळली होती. त्या काळात त्यांनी ग्रामीण भागात जोरदार प्रचार करून आपल्या काकूंसाठी विजय संपादन केला होता. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातला भाजपचा हा पहिला विजय होता. देवेंद्र फडणवीस यांनी वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी केलेल्या या निवडणूक प्रचारातून त्यांच्या राजकीय प्रगल्भतेची चुणूक तेव्हाच दिसून आल्याचं त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलंय.