Karuna Sharma : करुणा शर्मा जामीन की कोठडीत वाढ? थोड्याच वेळात अंबाजोगाई न्यायालयात सुनावणी
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या कथित पत्नी करुणा शर्मा या सध्या बीडच्या जिल्हा कारागृहात आहेत. काही दिवसांपूर्वी त्या परळीमध्ये आल्या होत्या आणि परळीमध्ये आल्यानंतर त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना अंबाजोगाईच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. करुणा शर्मा यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्यांच्या वकिलांनी त्यांच्या जामिनासाठी अंबाजोगाईच्या कोर्टामध्ये अर्ज दाखल केला होता आणि याच जामिनाच्या अर्जावर आज अंबाजोगाईच्या कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. यासर्व प्रकरणानंतर आता करुणा शर्मा यांना आज जामीन मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
