Badlapur School : एनकाउंटर करा, ठोकून काढा ; बदलापूर प्रकरणी Avinash Jadhav आक्रमक
Badlapur School : एनकाउंटर करा, ठोकून काढा ; बदलापूर प्रकरणी Avinash Jadhav आक्रमक
बदलापूर मधील एका नामांकित शाळेत अल्पवयीन दोन मुलीवर लैगिक अत्याचार ची घटना घडली असून आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे त्याच प्रमाणे शाळेसमोर हजारोंच्या संखेत पालक राजकीय मंडळी सामाजिक कार्यकर्त्यांनी शाळेसमोर आंदोलन सुरु केले आहे
पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या मुलींच्या पालकांना तब्बल 12 तास ताटकळत ठेवण्यात आलं होतं.
बदलापूरमधील एका नामांकित शाळेत साडेतीन वर्षाच्या दोन मुलींचे कंत्राटी सफाई कामगाराने शारीरिक शोषण केल्याने पालकवर्ग हादरला या प्रकरणात अखेर 4 दिवसांनी शाळा प्रशासनाने आपली बाजू मांडली असून शाळेच्या मुख्याध्यापिकांना निलंबित, तर वर्गशिक्षिका आणि आया यांना थेट नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे. तर आरोपी कंत्राटी सफाई कामगार ज्या कंत्राटदारामार्फत पुरवण्यात आला होता त्याच्यासोबतचा करारही शाळेने रद्द केला असून शाळेच्या सर्व पालक वर्गाची शाळेने जाहीर माफी मागितली आहे.
बदलापूर शहरातील एका जुन्या आणि नामांकित शाळेत हा संताप जनक प्रकार घडला होता. यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या मुलींच्या पालकांना तब्बल 12 तास ताटकळत ठेवण्यात आलं होतं. अखेर मनसेच्या हस्तक्षेपानंतर रात्री 1 वाजता पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यावरून पोलीस प्रशासना विरोधात संताप व्यक्त होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. तसंच बदलापूर पोलीस ठाण्यात दोन नवीन पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
आज बदलापूर बंदची हाक दिली आहे आंदोलन सुरु असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे