Ind vs Aus 3rd Test : पाऊस करणार टीम इंडियाचा गेम! गाबा कसोटी ड्रॉ झाल्यास WTC समीकरण बिघडणार, जाणून घ्या कुठं होणार खेळखंडोबा?
भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफीची (Border Gavaskar Trophy) तिसरी कसोटी ब्रिस्बेनमध्ये (Brisbane) खेळली जात आहे.
Team India WTC Final Scenario : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफीची (Border Gavaskar Trophy) तिसरी कसोटी ब्रिस्बेनमध्ये (Brisbane) खेळली जात आहे. या सामन्याबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे, पण पहिल्या दिवशी इंद्रदेव त्यांचे मनसुबे उधळून लावले. आतापर्यंत फक्त 80 चेंडू खेळले गेले असून पावसामुळे 4 तासांचा खेळ वाया गेला. ब्रिस्बेनमधून जे फोटो समोर आले आहे ते पाहता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीत पाऊस खलनायक ठरू शकतो, असे दिसत आहे. अशा परिस्थितीत पावसामुळे हा सामना अनिर्णित राहिला तर त्याचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यावर काय परिणाम होईल हा मोठा प्रश्न आहे.
WTC फायनलवर नजर टाकली तर टीम इंडियासाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. ॲडलेड कसोटीत भारताला पराभवाला सामोरे जावे लागले, त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत ते तिसऱ्या स्थानावर घसरले. ब्रिस्बेनमध्ये खेळला जाणारा कसोटी सामना अनिर्णित राहिला तर टीम इंडियासाठी डब्ल्यूटीसी फायनलचा मार्ग कठीण होईल.
ब्रिस्बेन कसोटी अनिर्णित राहिल्यास काय होईल?
पुढील वर्षी डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना इंग्लंडमधील लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. या मेगा स्पर्धेसाठी अनेक संघ शर्यतीत आहे, त्यात रोहित शर्मा आणि कंपनीचाही समावेश आहे. या शर्यतीत दक्षिण आफ्रिका आघाडीवर आहे. एक कसोटी जिंकताच दक्षिण आफ्रिकेचे WTC फायनलचे तिकीट निश्चित होईल. दुसऱ्या स्थानासाठी ऑस्ट्रेलिया, भारत आणि श्रीलंका यांच्यात स्पर्धा आहे. WTC 2025 फायनलसाठी पात्र होण्यासाठी भारताला बॉर्डर-गावसकर ट्रॉफी किमान 3-1 च्या फरकाने जिंकावी लागेल.
To everyone who woke up at 5, we feel you 🥲
— Star Sports (@StarSportsIndia) December 14, 2024
UPDATE: The second session has been washed out! 🌧#AUSvINDOnStar 👉 3rd Test, Day 1, LIVE NOW! | #ToughestRivalry #BorderGavaskarTrophy pic.twitter.com/AXBTeNVrQZ
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ब्रिस्बेन कसोटी अनिर्णित राहिल्यास, टीम इंडियाला WTC फायनलमध्ये जाण्यासाठी उर्वरित दोन्ही कसोटी जिंकाव्या लागतील. असे झाल्यास, मालिकेची स्कोअरलाइन 3-1 अशी संपेल आणि WTC फायनलसाठी रोहित आणि कंपनीचे स्थान निश्चित होईल.
ब्रिस्बेन कसोटीत पराभव झाला तर काय होईल?
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारताचा पराभव झाला तरीही ते WTC फायनलच्या शर्यतीत राहतील. मात्र, त्यानंतर त्यांचे भवितव्य त्यांच्या हाती राहणार नाही. तिसरी कसोटी गमावल्यानंतर भारताने मालिकेतील उर्वरित दोन सामने जिंकले तर ती मालिका 3-2 ने जिंकेल. या स्थितीत श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने किमान एक तरी कसोटी गमावावी, अशी प्रार्थना त्यांना करावी लागेल.
हे ही वाचा -