एक्स्प्लोर
पायाला दुखापत, वाचविण्यासाठी सर्वांची धावपळ, पण अखेर वाघिणीने जीव सोडला; डॉक्टरांचेही डोळे पाणावले
यवतमाळ जिल्ह्यामधील त्या जखमी वाघिणीचा नागपुरात उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याने वन विभागात आणि वन्यप्राणी प्रेमींकडून हळहळ व्यक्त होत आहे.
Yavatmal female tiger death in nagpur
1/7

यवतमाळ जिल्ह्यामधील त्या जखमी वाघिणीचा नागपुरात उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याने वन विभागात आणि वन्यप्राणी प्रेमींकडून हळहळ व्यक्त होत आहे.
2/7

यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबन वनपरिक्षेत्रातील भेंडाळा नियतक्षेत्र सावळी रोपवनामध्ये वाघिणीच्या मागच्या पायाला दुखापत झाल्याचे मंगळवारी आढळून आले होते.
3/7

वाघिणीला मागचा पाय उचलता येत नसल्याने या परिस्थितीत तिच्या जीवाला धोका असल्याने तिला उपचारासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जलद बचाव पथकाने काल संध्याकाळी जेरबंद केले होते.
4/7

वाघिणीला रात्री उशिरा जेरबंद केल्यानंतर वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संबंधित डॉक्टरांच्या मदतीने वाघिणीवर प्राथमिक उपचारही केले होते.
5/7

वाघिणीला जेरबंद केल्यानंतर प्राथमिक उपचार करुन तिला जखमी अवस्थेतच पुढील उपचाराकरीता नागपूर येथील गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात स्थलांतरीत करण्यात आले.
6/7

मात्र, उपचारापूर्वीच आज तिचा मृत्यू झाला, तिच्या मृत्यूनंतर तिला वाचविण्यासाठी धडपडणाऱ्या वन अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही डोळे पाणावले होते. गोरेवाडा बचाव केंद्रात आज शवविच्छेदन करुन तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
7/7

दरम्यान, वाघ हा हिंस्त्र प्राणी असल्याने मानवांसोबत त्याचाल सहसा लळा लागत नाही. मात्र, जखमी वाघिणीला उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना काही क्षणातच त्या वाघिणीबद्दल आपुलकी निर्माण झाली होती.
Published at : 02 Apr 2025 07:55 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नांदेड
करमणूक
व्यापार-उद्योग
























