Nashik News : नववर्षापासून सरकारी कर्मचाऱ्यांना शिस्तीचे धडे, गणवेश अन् ओळखपत्राची सक्ती, नाशिक जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय
Nashik News : नवीन वर्षापासून सरकारी कर्मचाऱ्यांना शिस्तीचे धडे दिले जाणार आहेत. गणवेश, ओळखपत्र बाळगणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांचा वापर करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.
नाशिक : नवीन वर्षापासून सरकारी कर्मचाऱ्यांना (Government Employees) शिस्तीचे धडे दिले जाणार आहेत. गणवेश, ओळखपत्र बाळगणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाचा वापर करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. 1 जानेवारी 2025 पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांनी गणवेशात (Uniform) कार्यालयात येण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ (Rajendra Wagh) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासह (Nashik Collector Office) उपविभागीय अधिकारी, तहसीलदार कार्यालयास या संदर्भात सूचना केल्या आहेत.
अनेक अधिकारी आणि कर्मचारी शासकीय कार्यालयात ओळखपत्राचा वापर करत नाहीत. नागरिकांनी विचारणा केल्यावर अधिकारी आपले ओळखपत्र दाखवत नाहीत. हे अयोग्य असल्याचे राजेंद्र वाघ यांनी सूचित केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामांसाठी नागरिक येतात. त्यांना शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची ओळख होण्यासाठी गणवेश आणि त्यांचे नाव, पदनाम ज्ञात होण्यासाठी ओळखपत्र ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. गणवेशाचे बंधन प्रत्येक आठवड्याच्या पहिल्या सोमवारी असून ओळखपत्र मात्र दररोज सर्वांना दिसेल अशा पध्दतीने बाळगावे लागणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकारी कार्यालयात नववर्षात शासकीय अधिकारी व कर्मचारी विशिष्ट रंगाच्या पेहरावात दिसून येणार आहेत.
'असा' असणार गणवेश
नवीन वर्षात प्रत्येक आठवड्याच्या पहिल्या सोमवारी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी फिकट निळ्या रंगाचा सदरा आणि काळ्या रंगाची विजार तर, महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी फिकट पिवळ्या रंगाची साडी, पिवळ्या रंगाचे ब्लाऊज अथवा पिवळ्या रंगाचे सलवार कमीज परिधान करावे, असे सूचित करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातील कार्यालयातील कर्मचारी आठवड्यात एक दिवस अशा पेहरावात दिसतील.
महिन्याच्या पहिल्या सोमवारी 'नो व्हेईकल डे'
पुरूष कर्मचाऱ्यांनी फिकट निळ्या रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची अथवा काळ्या रंगाची पॅन्ट परिधान करावी. महिला कर्मचाऱ्यांनी फिकट पिवळ्या रंगाची साडी आणि गडद पिवळया रंगाचे ब्लाउज किंवा पिवळ्या रंगाचे सलवार कमीज परिधान करावे. तसेच प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी 'नो व्हेईकल डे' पाळण्याच्या सूचना शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. सायकल किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, असे वाघ यांनी सूचित केले आहे. तर प्रत्येक कर्मचाऱ्याला आपले ओळख पत्र गळ्यात घालणे बंधनकारक करण्यात आले आहे.
आणखी वाचा
पेपरफुटीवर बसणार चाप! MBBS पेपर फुटीप्रकरणी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय; आता...