Maharashtra Cabinet Expansion: शिवसेनेत मंत्रिपदासाठी लॉबिंग,अकार्यक्षम वाचाळवीरांना मिळणार नारळ, शिंदेसेनेच्या यादीत अनपेक्षित बदल?
Maharashtra Cabinet Expansion: राज्य मंत्रिमंडळाचा उद्या (15 डिसेंबर) नागपूरमध्ये विस्तार होणार आहे. 1991 नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी (Maharashtra Cabinet Expansion) होणार आहे.
Maharashtra Cabinet Expansion: राज्याच्या मंत्रीमंडळ विस्तारासाठी अवघा एक दिवस राहिलेला असताना आता शिंदेंच्या शिवसेनेत अनपेक्षित बदल घडणार असल्याचं सांगण्यात येत आहे. शिवसेनेत मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरु असल्याची चर्चा असून शुक्रवारी रात्री अनेक इच्छुक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला दाखल झाले होते. अकार्यक्षम आणि वाचाळवीरांना शिंदेंकडून नारळ दिला जाणार असल्याची माहिती पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे. मंत्रीमंडळ विस्तारासाठी एक दिवस राहिलेला असताना इच्छुक आमदार वर्षा आणि सागरमध्ये गर्दी दिसत आहे. शुक्रवारी शिंदेंच्या भेटीसाठी गेलेल्या आमदारांमध्ये संजय शिरसाट, योगेश कदम, विजय शिवतारे, तानाजी सावंत, दिपक केसरकर यांच्या नावाचा समावेश आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा उद्या (15 डिसेंबर) नागपूरमध्ये विस्तार होणार आहे. 1991 नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी (Maharashtra Cabinet Expansion) होणार आहे. उद्या दुपारी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. महायुतीच्या मंत्रिमंडळात भाजपचे 21, शिवसेनेचे 12, राष्ट्रवादीचे 10 मंत्री असणार आहे, अशी सूत्रांची माहिती आहे.
शिवसेनेत मंत्रीपदासाठी लॉबिंग सुरू?
शिवसेनेच्या यादीत यंदा अनपेक्षित असा बदल पहायला मिळेल अशी चर्चा आहे. नवीन चेहऱ्यांना यंदा शिवसेनेत प्राधान्य दिले जाणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली. दरम्यान, मंत्रीमंडळ विस्ताराला अवघा एक दिवस शिल्लक असताना शिंदेसेनेतील आमदार वर्षा, सागर बंगल्यांवर भेटीसाठी दाखल झाले होते. या मंत्रीमंडळ विस्तारात अकार्यक्षम आणि वाचाळवीरांना शिंदोंकडून नारळ दिला जाणार असल्याची माहिती पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे.शुक्रवारी रात्री अनेक इच्छुक शिंदेंच्या भेटीला दाखल झाले होते. यात प्रामुख्याने संजय शिरसाट, योगेश कदम, विजय शिवतारे, तानाजी सावंत, दिपक केसरकर यांच्या नावाचा समावेश आहे. यावेळी यावेळी उदय सामंतही होते वर्षा बंगल्यावर होते.
राजभवनात मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी तयारीला सुरुवात
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा उद्या (रविवारी) नागपुरातील राजभवनात होणार आहे. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारात भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष त्यांच्या कोट्यातील काही मंत्रीपद रिक्त ठेवू शकतात अशी शक्यता आहे. दोन्ही पक्षात मंत्री पदासाठी इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे दोन्ही पक्षांकडून काही मंत्रीपद रिक्त ठेवले जाऊ शकतात अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान राजभवनात मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी तयारीला सुरुवात झाली आहे. उद्या संध्याकाळी चार वाजता हा शपथविधी सोहळा राजभवनातील लॉनवर होण्याची शक्यता आहे. एवढ्या मोठ्या संख्येने मंत्र्यांच्या शपथविधीसाठी राजभवनात तेवढ्या क्षमतेचा सभागृह नाही, त्यामुळे राजभवनाच्या लॉनवर शपथविधी सोहळा होऊ शकेल अशी शक्यता आहे.
हेही वाचा: