Gold Price Bonds: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅक्स धोरणामुळे शेअर बाजाराची धास्ती वाढली, 7 दिवसांत सोन्याचा भाव 3500 हजारांनी वाढला
Share Market & Gold price: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात प्रचंड मोठी घसरण दिसून येत आहे. सेन्सेक्स मंगळवारी 1300 अंकांनी कोसळला होता. ट्रम्प यांच्या धोरणामुळे शेअर बाजारात टेन्शन

मुंबई: शेअर बाजारात प्रचंड पडझड सुरु असताना सोन्याच्या दरात चढउतार सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत बुधवारी (2 एप्रिल) सकाळी बाजार उघडल्यानंतर सोन्याचा भाव 93, 650 रुपये इतका होता. काल सोन्याचा भाव 93 हजार 700 रुपये इतका होता. सोन्याच्या दरात (Gold price) किंचित घसरण झाली आहे. मात्र, शेअर बाजारातील अस्थिरता पाहता सोन्याच्या दरात (Gold Rates) पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या महिनाभरात सोन्याच्या भावात मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. 25 मार्च रोजी सोन्याचा भाव 90 हजार 186 रुपये इतका होता.
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून आयात करासंदर्भात निर्णय घेण्यात आल्यानंतर सोन्याच्या भावात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. शेअर बाजारातील (Share Market) अस्थिरतेमुळे गुंतवणुकदार सोन्याकडे वळण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या 7 दिवसांमध्ये सोन्याचा भाव 3500 हजारांनी वाढला आहे.
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड्स जारी करणे टाळले
सोन्याच्या किंमतीतील चढ्या दरामुळे 2024-25 मध्ये केंद्र सरकारने सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड्सच्या माध्यमातून कर्ज घेणे टाळल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारकडून सार्वभौम सुवर्ण रोख्यांऐवजी सरकारी बॉण्ड्सच्या माध्यमातून कमी व्याजदराने पैसे उभे करण्याचा प्रयत्न . सोन्याच्या दरातील अस्थिर वातावरणामुळे सुवर्ण रोख्यांमध्ये मोठी तेजी आली आहे.
सरकारकडून 2025-26 च्या अर्थसंकल्पात नवीन सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड जारी करण्यात आलेले नाहीत. आतापर्यंत, 67 टप्प्यांमध्ये 146.96 टन सोन्याच्या समतुल्य एसजीबी जारी करण्यात आले आहेत. 20 मार्च 2025 पर्यंत, एकूण 130 टन सोन्याच्या समतुल्य बॉण्ड्स अजूनही सक्रिय, ज्याचे एकूण मूल्य 67 हजार 322 कोटी (इश्यू किमतीवर) मात्र, आत्ताच्या सोन्याच्या दरानुसार जर ह्या सर्व गुंतवणूकदारांनी रोखे काढलेत तर सरकारला जवळपास 1.2 लाख कोटी रुपये गुंतवणूकदारांना द्यावे लागतील.
सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड्स म्हणजे काय?
सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड (SGB) ही एक सरकारी योजना आहे ज्यामध्ये तुम्ही प्रत्यक्ष सोने खरेदी न करता सोन्यात गुंतवणूक करू शकता. हे बॉण्ड्स सोन्याच्या किंमतीशी जोडलेले आहेत. भारत सरकार आणि आरबीआय संयुक्तपणे ते जारी करतात. तुम्हाला दर सहा महिन्यांनी गुंतवणूकीच्या रकमेवर 2.5 टक्के वार्षिक व्याज देखील मिळते.
सोन्याच्या किंमतींनी उच्चांक गाठला आहे, मागील चार महिन्यांत सोन्याचा दर जवळपास 17 हजारांनी वाढला आहे. अशातच, एसजीबी सरकारवर मोठा आर्थिक भार निर्माण करत आहे, कारण गुंतवणूकदारांना 2.5 टक्के व्याज द्यावे लागते आणि जेव्हा बॉण्ड मॅच्युअर (८ वर्षांनंतर) होतो तेव्हा त्यांना बाजारभाव द्यावा लागतो. सरकारसाठी एसजीबीकडून कर्ज घेणे महाग होत चालले आहे, परंतू गुंतवणूकदारांसाठी हा आतापर्यंतचा सर्वात फायदेशीर करार बनला आहे.
आणखी वाचा
























