एक्स्प्लोर

Dombivli : नोकरी लावतो म्हणून तरुणीवर बलात्कार, ठाकुर्लीतील रील स्टार सुरेंद्र पाटीलवर गुन्हा दाखल

Dombivli Reel Star Surendra Patil : शरीरसंबंधाचे व्हिडीओ समाज माध्यमांत प्रसारित करण्याची धमकी देत पुन्हा अत्याचार केल्याचा आरोप नाशिकच्या तरुणीने रील स्टार सुरेंद्र पाटील विरोधात केली आहे.

ठाणे : डोंबिवलीजवळील ठाकुर्लीतील रील स्टार, विकासक सुरेंद्र पाटील (Dombivli Reel Star Surendra Patil) याच्या विरुद्ध बलात्काराचा आणि मारहाणीचा गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई विमानतळावर नोकरी लावतो असं आमिष दाखवत सुरेंद्र पाटील याने तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. नाशिक भागातील एका 19 वर्षाच्या तरूणीने डोंबिवली मानपाडा पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तात्काळ पाटील याच्या विरुद्ध कारवाई करत लैंगिक अत्याचार, शस्त्र प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

सुरेंद्र पाटील हा विकासक असून तो रिल स्टार देखील आहे. त्याच्यावर कल्याण डोंबिवलीतील पोलिस ठाण्यात जवळपास 13 गुन्हे दाखल आहेत. 16 फेब्रुवारी ते 29 मार्च या कालावधीत डोंबिवली पूर्वेतील दावडी भागात हा प्रकार घडल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी सुरेंद्र पाटील आणि त्यांचा वाहन चालक या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

इन्स्टाग्रामवरून एका तरुणीची सुरेंद्र पाटील याच्याशी ओळख झाली. सुरेंद्र पाटील याने  मुंबई विमानतळावर तुला नोकरी लावतो असे सांगून नाशिकच्या त्या तरुणीला कार्यालयात बोलावून घेतले. त्यानंतर त्याने बंदूक दाखवून तुझ्या आई वडिलांना मारून टाकीन अशी धमकी देत तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध केले असा आरोप आहे.

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

त्याचप्रमाणे 29 मार्च रोजी सुरेंद्र पाटील याने धमकी देत शरीर संबंधाचे व्हिडीओ समाज माध्यमांत प्रसारित करेन अशी धमकी त्या तरुणीला दिली. त्यावेळी आरोपीने आपल्या मनाविरुद्ध त्यांच्या कार्यालयात जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. आपला विनयभंग केला. आपण शरीर संबंधासाठी विरोध करत असताना त्याने केस पकडून मारहाण केली. आक्रमक प्रतिकार केल्यानंतर सोनसाखळी चोरीचा आळ आरोपीने घातला. त्यानंतर त्यांच्या कार्यालयातून बाहेर पडत असताना सुरेंद्र पाटील आणि त्यांच्या चालकाने आपल्यासोबत गैरप्रकार केल्याचं पीडितेने फिर्यादीत म्हटलं आहे. याप्रकाराने आपल्या मनास लज्जा उत्पन्न झाली, अशी तक्रार पीडित महिलेने मानपाडा पोलीस ठाण्यात केली आहे.

मानपाडा पोलीस ठाण्यात वरिष्ठांच्या खुर्चीत बसून रील तयार करणे, परवानाधारी बंदुकीचा दुरूपयोग करणे, मोठ्या प्रमाणात पैसे दाखवून त्याचे रील्स तयार करणे अशा काही प्रकरणात सुरेंद्र पाटीलवर यापूर्वीच मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. 

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jaya Kishori: जया किशोरींच्या हातावर मेहंदी सजली; फोटो समोर, गुलाबी सूटसह कानातील रिंग्जनेही लक्ष वेधलं
जया किशोरींच्या हातावर मेहंदी सजली; फोटो समोर, गुलाबी सूटसह कानातील रिंग्जनेही लक्ष वेधलं
शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार भाजपच्या गळाला? आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचा पलटवार
शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार भाजपच्या गळाला? आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचा पलटवार
तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून भाजप आमदाराला धमकी; अधिवेशनाला पोहोचताच बघून घेतो म्हणत फोन कॉल
तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून भाजप आमदाराला धमकी; अधिवेशनाला पोहोचताच बघून घेतो म्हणत फोन कॉल
मोठी बातमी! MPSC ने 21 डिसेंबरची पूर्व परीक्षा पुढे ढकलली; सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय
मोठी बातमी! MPSC ने 21 डिसेंबरची पूर्व परीक्षा पुढे ढकलली; सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय

व्हिडीओ

Nilesh Rane-Ravindra Chavan :  रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे समोरा-समोर, विधानभवनात काय घडलं?
Nana Patole vs Devendra Fadnavis : पहिल्याचं दिवशी पटोले भिडले, फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
Eknath Shinde Urban Development : नगरविकास विभागाकडून सायनचा 2 एकर भूखंड विहिंपला भाडेतत्वावर
BMC Elections : भाजप, शिवसेना बीएमसीसाठी जागावाटपाचा तिढा सामोपचाराने सोडवणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jaya Kishori: जया किशोरींच्या हातावर मेहंदी सजली; फोटो समोर, गुलाबी सूटसह कानातील रिंग्जनेही लक्ष वेधलं
जया किशोरींच्या हातावर मेहंदी सजली; फोटो समोर, गुलाबी सूटसह कानातील रिंग्जनेही लक्ष वेधलं
शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार भाजपच्या गळाला? आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचा पलटवार
शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार भाजपच्या गळाला? आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचा पलटवार
तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून भाजप आमदाराला धमकी; अधिवेशनाला पोहोचताच बघून घेतो म्हणत फोन कॉल
तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून भाजप आमदाराला धमकी; अधिवेशनाला पोहोचताच बघून घेतो म्हणत फोन कॉल
मोठी बातमी! MPSC ने 21 डिसेंबरची पूर्व परीक्षा पुढे ढकलली; सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय
मोठी बातमी! MPSC ने 21 डिसेंबरची पूर्व परीक्षा पुढे ढकलली; सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय
'एकट्या कोचला टार्गेट करू नका, माझ्यासोबतही असं झालं होतं'! गौतम गंभीर यांच्या मदतीला चक्क विरोधक धावला; गुरुजींना सुचक इशाराही दिला
'एकट्या कोचला टार्गेट करू नका, माझ्यासोबतही असं झालं होतं'! गौतम गंभीर यांच्या मदतीला चक्क विरोधक धावला; गुरुजींना सुचक इशाराही दिला
मोठी बातमी! बार्शी बाजार समितीवर भाजपच्या राऊत गटाचे वर्चस्व; सत्ता कायम राखत सोपल-बारबोले गटाला 'दे धक्का'
मोठी बातमी! बार्शी बाजार समितीवर भाजपच्या राऊत गटाचे वर्चस्व; सत्ता कायम राखत सोपल-बारबोले गटाला 'दे धक्का'
PM Modi on Vande Mataram: फोडा आणि राज्य करा ही ब्रिटिशांची नीती होती, वंदे मातरम शंभर वर्षाचे झाले तेव्हा देशभक्तांना जेलमध्ये टाकलं, संविधानाची गळचेपी झाली : पीएम मोदी
फोडा आणि राज्य करा ही ब्रिटिशांची नीती होती, वंदे मातरम शंभर वर्षाचे झाले तेव्हा देशभक्तांना जेलमध्ये टाकलं, संविधानाची गळचेपी झाली : पीएम मोदी
Manoj Jarange and Dhananjay Munde: धनुभाऊकडून माझ्या अंगावर गाडी घालण्याचा डाव, अजितदादा पापात सहभागी होऊ नका, अन्यथा... मनोज जरांगेंचा इशारा
धनुभाऊकडून माझ्या अंगावर गाडी घालण्याचा डाव, अजितदादा पापात सहभागी होऊ नका, अन्यथा... मनोज जरांगेंचा इशारा
Embed widget