एक्स्प्लोर

मुंबईतील रेडी रेकनरचे दर ठरविण्यासाठी मायक्रो झोनिंग करणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

मुंबईतील इमारतींबाबत रेडी रेकनरचे दर ठरविताना काही भागात अधिक दर लावण्यात आले आहेत. त्या संबधी मुंबईतील सर्व आमदारांची बैठक घेण्यात येणार आहे. 

मुंबई: शहरामध्ये अनेक प्रकल्पांचे पुननिर्माण सुरु आहे. पण मोठ्या इमारतींच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीतील इमारती तसेच चाळींना देखील मोठ्या इमारतींप्रमाणे रेडी रेकनरचा दर लावला जातो. असे होऊ नये यासाठी मायक्रो झोनिंग करणे आवश्यक आहे. यासाठी मुंबईतील सर्व आमदारांची 16 एप्रिलला बैठक आयोजित करण्यात आली असून त्यामध्ये प्रारुप आराखडा तयार करण्यात येईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीत दिली. 

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रेडी रेकनरच्या दराबाबत लक्षवेधीद्वारे प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यानिमित्ताने आयोजित बैठकीत बावनकुळे बोलत होते. बैठकीला आमदार अनिल परब, सचिन अहिर, प्रवीण दरेकर आदी उपस्थित होते. 

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मुंबईतील इमारतींबाबत रेडी रेकनरचे दर ठरविताना काही भागात अधिक दर लागले आहेत. याबाबत सिटी सर्व्हेनुसार दर ठरविण्याची आवश्यकता आहे. सर्वच इमारतींना एकसारखा दर ठरवून चालणार नाही. यासाठी दर ठरविताना जीआयएस प्रणालीचा वापर करण्यात यावा तसेच याची सुरुवात मुंबईपासून करण्यात यावी. सध्या मुंबईत वेगाने पुननिर्माणाचे काम सुरु आहे. त्यामुळे मुंबईतून सुरुवात करुन मग राज्याच्या इतर भागातही याबाबत निर्णय घेतला जाईल. 

सध्या शासनाकडे दर अधिक लागले गेल्यास एमपीडी अँक्ट 34 नुसार सुधारणा करता येते. त्यामध्ये 40 टक्क्यांची वजावट करुन 60 टक्क्यांपर्यंत रेडी रेकनरचा दर आकरला जातो. मात्र, हा दरही अधिक असल्याची भूमिका लोकप्रतिनिधींनी मांडली. त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन मुंबईतील सर्व आमदारांची 16 एप्रिल रोजी बैठक आयोजित करण्याची ग्वाही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

बनावट नकाशे सादर करुन तयार केलेली बांधकामे पाडावीत

मुंबईत बनावट नकाशे सादर करुन महानगरपालिकेमार्फत बांधकामाची परवानगी मिळविलेली बांधकामे तातडीने निष्कासित करावीत. त्याचप्रमाणे या अनुषंगाने स्थापन केलेल्या एसआयटी द्वारे संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

आयुक्त गगराणी यांनी याबाबत माहिती देताना बांधकाम परवानगी ऑनलाईन दिली जात असल्याची माहिती दिली. ते म्हणाले, बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळविलेल्या परवानगीच्या आधारे केलेली बांधकामे ही अनधिकृत ठरतात, अशी 457 बांधकामे असून त्यापैकी 66 प्रकरणी कारवाई करण्यात आली असून इतरांना नोटीस देण्यात येईल. त्याचप्रमाणे एसआयटी कडे देखील तक्रार दाखल करण्यात येईल. एसआयटीमार्फत आतापर्यंत झालेल्या चौकशी नुसार 20 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती एसआयटीमार्फत देण्यात आली.

मंत्री बावनकुळे यांनी महानगरपालिकेमार्फत जुलै महिन्यापूर्वी ही कार्यवाही पूर्ण करण्याची सूचना यावेळी केली. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
Shivsena : प्रियंका चतुर्वेदींच्या खासदारकीवरुन आदित्य ठाकरेंवर नाराजी, ठाकरेंचे आमदार-खासदार अस्वस्थ; शिंदेंच्या मंत्र्याचा मोठा दावा
प्रियंका चतुर्वेदींच्या खासदारकीवरुन आदित्य ठाकरेंवर नाराजी, ठाकरेंचे आमदार-खासदार अस्वस्थ; शिंदेंच्या मंत्र्याचा मोठा दावा
Rohit Pawar on Ajit Pawar plane Crash: रोहित पवारांकडून विमानांबाबत धोक्याचा इशारा, तरीही महाराष्ट्रातील बड्या नेत्याचा VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, मालक स्वत: स्वागताला
रोहित पवारांकडून विमानांबाबत धोक्याचा इशारा, तरीही महाराष्ट्रातील बड्या नेत्याचा VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, मालक स्वत: स्वागताला

व्हिडीओ

Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari : मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार, नारायण राणेंसमोर नितीन गडकरींचा शब्द
मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार पण उद्घाटनाला येणार नाही, नितीन गडकरींनी कारण सांगितलं
Personal Loan : वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
मोठी बातमी : मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
SIP : गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
Devendra Fadnavis : भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
RBI : डिजीटल फसवणूक रोखण्यासाठी मास्टरस्ट्रोक, UPI वरुन 10 हजार रुपये पाठवल्यास 1 तास वाट पाहावी लागणार,आरबीआय नवा नियम लागू करण्याची शक्यता
UPI वरुन 10 हजार रुपये पाठवल्यास 1 तास वाट पाहावी लागणार,आरबीआय नवा नियम लागू करण्याची शक्यता
तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही; पाकिस्तानातील चर्चेला काही तास बाकी असतानाच इराणचा थेट पवित्रा? अमेरिका काय करणार, चर्चेसाठी ठरलेलं शिष्टमंडळ सुद्धा पोहोचलं नाही
तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही; पाकिस्तानातील चर्चेला काही तास बाकी असतानाच इराणचा थेट पवित्रा? अमेरिका काय करणार, चर्चेसाठी ठरलेलं शिष्टमंडळ सुद्धा पोहोचलं नाही
Embed widget