एक्स्प्लोर
Yashasvi Jaiswal: 'मला त्या क्रिकेट संघाकडून खेळायचं नाहीय'; आयपीएल सुरु असताना यशस्वी जैस्वालच्या निर्णयाने खळबळ
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालच्या या निर्णयामुळे क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे.
Yashasvi Jaiswal
1/11

आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या यशस्वी जैस्वालने स्पर्धेच्या मध्यभागी एक मोठा निर्णय घेतला आहे.
2/11

यशस्वी जैस्वालला देशांतर्गत स्पर्धेत मुंबई संघाकडून खेळायचे नाही, या संदर्भात त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मागितले आहे.
3/11

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, यशस्वी जैस्वालने मंगळवारी (1 एप्रिल) एमसीएला एक ईमेल लिहून पुढील हंगामासाठी मुंबईहून गोव्यात त्यांचा क्रिकेट राज्य संघ बदलण्यासाठी एनओसी मागितली आहे.
4/11

यशस्वी जैस्वालला देशांतर्गत क्रिकेटमध्ये आता मुंबईकडून खेळायचे नाहीय. यशस्वी जैस्वाल गोवा संघाकडून खेळण्यास इच्छुक आहे. त्यामुळे यशस्वी जैस्वालने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
5/11

यशस्वी जैस्वालच्या या निर्णयामुळे क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे.
6/11

यशस्वी जैस्वालने आमच्याकडे ना-हरकत प्रमाणपत्र मागितले आहे. गोवा संघाकडून खेळण्यासाठी त्याने वैयक्तिक कारणे सांगितली आहेत," असे एमसीएच्या एका सूत्राने सांगितले.
7/11

गेल्या वर्षी, बीसीसीआयने सर्व खेळाडूंना निर्देश दिले होते की जे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नाहीत त्यांना देशांतर्गत सामने खेळावे लागतील.
8/11

यशस्वी जैस्वालही मुंबई संघाकडून खेळताना दिसला.
9/11

यशस्वी जैस्वाल कारकीर्द- यशस्वी जैस्वालने 36 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 3712 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याचा सर्वोच्च धावसंख्या 265 आहे.
10/11

यशस्वी जैस्वालने प्रथम श्रेणी सामन्यात 13 शतके आणि 12 अर्धशतके केली आहेत. यशस्वी जैस्वालने लिस्ट ए मध्ये 33 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 1526 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 5 शतके आणि 7 अर्धशतके झळकावली आहेत.
11/11

2023 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा यशस्वी जैस्वाल सध्या भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळतो. यशस्वी जैस्वालने 19 कसोटी, 1 एकदिवसीय आणि 23 टी-20 सामने खेळले आहेत. यशस्वी जैस्वालने कसोटीत 4 शतके आणि टी-20 मध्ये 1 शतक झळकावले आहे.
Published at : 02 Apr 2025 05:17 PM (IST)
आणखी पाहा























