एक्स्प्लोर

LSG vs PBKS IPL 2025: युझवेंद्र चहलच्या ताबा सुटला, पंजाबकडून पहिली विकेट घेताच निकोलस पूरनला नको ते बोलला, VIDEO

IPL 2025 Lucknow Super Giants vs Punjab Kings: आयपीएल 2025 च्या हंगामात काललखनौ सुपर जायट्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात सामना खेळवण्यात आला.

IPL 2025 Lucknow Super Giants vs Punjab Kings: आयपीएल 2025 मध्ये काल (1 एप्रिल ) लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स (Lucknow Super Giants vs Punjab Kings) यांच्यातील सामना खेळवण्यात आला. पंजाब किंग्सने या सामन्या 8 विकेट्सने विजय मिळवला. एकाना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात लखनौ संघाने प्रथम फलंदाजी करत 171 धावा केल्या. ऋषभ पंत, मिचेल मार्श आणि डेव्हिड मिलर सारखे प्रसिद्ध फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरले. दरम्यान, निकोलस पूरनने 30 चेंडूत 44 धावांची खेळी केली आणि एकेकाळी निकोलस पूरन लखनौ संघाला मोठ्या धावसंख्येकडे घेऊन जात होता, पण पंजाब किंग्सचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने त्याला बाद केले.

मार्कस स्टोइनिसने टाकलेल्या 11 व्या षटकात निकोलस पूरनने एक चौकार आणि एक मोठा षटकार मारला. निकोलस पूरन आक्रमक खेळी खेळत होता. त्यामुळे त्याला लवकरात लवकर बाद करणे पंजाबसाठी महत्वाचे होते. श्रेयस अय्यरने पुढच्याच षटकात युझवेंद्र चहलच्या हातात चेंडू दिला. या 12 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर, पूरनने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू हवेत गेला. ग्लेन मॅक्सवेलने पूरनचा झेल घेऊन त्याला बाद केले. मॅक्सवेलने कॅच घेतल्यानंतर जेव्हा कॅमेरा चहलकडे वळला तेव्हा तो निकोलस पूरनला शिवीगाळ करताना दिसला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पंजाबकडून युझवेंद्र चहलची पहिली विकेट

आयपीएल 2025 मध्ये, युजवेंद्र चहलने पंजाब किंग्सकडून पदार्पण केले आहे. पहिल्या सामन्यात म्हणजे गुजरात टायटन्सविरुद्ध चहलला एकही विकेट घेता आली नाही, पण लखनौविरुद्ध त्याने निकोलस पूरनला बाद केले. इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात पंजाबकडून खेळताना चहलचा हा पहिलाच बळी आहे.

युझवेंद्र चहल आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाज-

युझवेंद्र चहल हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे आणि आयपीएलच्या इतिहासात 200 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणारा तो एकमेव गोलंदाज आहे. युझवेंद्र चहलने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत 206 विकेट्स घेतल्या आहेत. चहलने बंगळुरुकडून खेळताना 139 आणि राजस्थान रॉयल्सकडून खेळताना 66 विकेट्स घेतल्या.

संबंधित बातमी:

LSG vs PBKS IPL 2025: आयपीएल 2025 मधील दुसरा राडा; लखनौचा नवखा खेळाडू भिडला, वेस्ट इंडिज स्टाईल सेलिब्रेशन, VIDEO

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

GT vs KKR IPL 2026 : ग्रीनची झुंज फिकी, गिलचा कहर! विजयासाठी आसुसलेल्या कोलकाताच्या नशिबी पुन्हा पराभव, गुजरातची टॉप-4 मध्ये दिमाखात एन्ट्री
ग्रीनची झुंज फिकी, गिलचा कहर! विजयासाठी आसुसलेल्या कोलकाताच्या नशिबी पुन्हा पराभव, गुजरातची टॉप-4 मध्ये दिमाखात एन्ट्री
GT vs KKR Live Update : अहमदाबादमध्ये गिलचं 'चक्रीवादळ'; केकेआरचा पालापाचोळा, गुजरातचा धमाका
GT vs KKR Score IPL 2026 : अहमदाबादमध्ये गिलचं 'चक्रीवादळ'; केकेआरचा पालापाचोळा, गुजरातचा धमाका
Mumbai Indians IPL 2026 : रोहित शर्मावर अन्याय, हार्दिक पांड्याला पहिल्यांदा कर्णधारपदावरून काढून टाका...; भारतीय दिग्गजाचा मुंबई इंडियन्सला थेट इशारा, काय काय म्हणाला?
रोहित शर्मावर अन्याय, हार्दिक पांड्याला पहिल्यांदा कर्णधारपदावरून काढून टाका...; भारतीय दिग्गजाचा मुंबई इंडियन्सला थेट इशारा, काय काय म्हणाला?
Romi Bhinder Fined IPL 2026 : डगआऊटमध्ये मोबाईल वापरला, BCCIने अखेर निकाल लावला; राजस्थान रॉयल्सच्या मॅनेजरवर कडक कारवाई, जाणून घ्या प्रकरण
डगआऊटमध्ये मोबाईल वापरला, BCCIने अखेर निकाल लावला; राजस्थान रॉयल्सच्या मॅनेजरवर कडक कारवाई, जाणून घ्या प्रकरण

व्हिडीओ

Nashik TCS Case Special Report : कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन?
Navneet Rana Vs Pyare Khan Special Report : अमरावती परतवाडा प्रकरण, राणा विरुद्ध खान वाद पेटला
Amravati Crime Special Report : विकृतीची परिसीमा गाठणारी पैज, परतवाडा प्रकरणात धक्कादायक खुलासे
Walmik Karad : देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Ashok Kharat : खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन, समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांनी लोकसभेत मांडली भूमिका
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांची लोकसभेत मांडली भूमिका
Amit Shah : महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच अमित शाहांची पोस्ट, 2029 चा उल्लेख करत विरोधकांना इशारा, पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया
महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच अमित शाहांची पोस्ट, 2029 चा उल्लेख करत विरोधकांना इशारा
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
Rahul Gandhi : संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर होताच राहुल गांधी यांची प्रतिक्रिया
संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, राहुल गांधींची प्रतिक्रिया ; प्रियांका गांधी काय म्हणाल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे
Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
Embed widget