Saat Barachya Batmya : 7/12 : सात बाराच्या बातम्या : अवकाळी पाऊस ते मिश्र शेती : 08 मार्च 2023
संगमनेरमध्ये वंदना शेळके ही उच्चशिक्षित तरुणी आज तब्बल २० एकरवरील शेतीचं व्यवस्थापन करतेय. या शेतीत आधुनिक तंत्र वापरत विविध प्रयोगही सुरु असतात. वंदनाने शेतीला दुग्ध व्यवसायाची जोडही दिली आहे. शेतीक्षेत्राला वंदना सारख्या तरुणींचीच गरज आहे. चला तिच्या गावाकडे शेळकेवाडीला जाऊयात
शहादा तालुक्यातील वडाळी गावातील शेतकरी कल्पना मोहिते यांची कहाणी प्रेरणादायी आहे. २००६ मध्ये पतीचे निधन झाल्यानतर घर आणि शेतीची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली आहे. १० किलोमीटर अंतरावरील तापी नदीपासून पाईपलाईनने पाणी आणत आपली शेती बागायती केली.
स्वतःच्या शेतीसोबत भाडेतत्त्वावर घेतलेली पंधरा एकर शेतीही त्यांनी सुधरवलीय.
आपल्या देशातील प्रत्येक क्षेत्रात स्त्रीशक्तीनं आपल्या कर्तृत्वाचे झेंडे गाडले आहेत. कृषी क्षेत्रालाही मोठी उंची देण्याचं काम अनेक महिला शेतकरी करत असतात. त्यातीलच एक आहेत अकोल्याच्या माझोडच्या पद्मा ताले. पतीला शेतीत मदत करत करत त्यांनी शेती विकासाचे अनेक टप्पे पार केले आहेत.
शेतकरी उत्पादक कंपन्यांना हरभरा खरेदी केंद्रे द्या, परभणी जिल्हा शेतकरी उत्पादक संघांची मागणी