(Source: ECI/ABP News/ABP Majha)
First Digital Password : जगातील पहिला Password कधी आणि कुणी बनवला? पासवर्डची गरज का पडली?
आपल्यातील बहुतांशजण आपली पर्सनल फाईल सुरक्षित राहण्यासाठी त्या फाईलला पासवर्डने प्रोटेक्ट करतो. यामुळे आपली प्रायव्हसी सुरक्षित राहण्यास मदत मिळते.
When was first Digital password invented? आज प्रत्येकजण आपल्या प्रायव्हसीला प्राधान्य देताना दिसून येतो. आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. अगदी, साधा फोन असो किंवा अँड्रॉईड स्मार्टफोन, त्याच्यात पासवर्डचा पर्याय मिळतो. यामुळे आपल्या स्मार्टफोनमधील इतर माहिती कुणालाही पाहता येत नाही. हा पासवर्ड एक प्रकारे सिक्युरिटीचं काम करतो. आज आपण सगळेजणच आपल्या कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल, टॅबलेट, ट्राव्हलिंग बॅग आणि पैसे ठेवायच्या लॉकरलासुद्धा पासवर्ड सेट करतो. यावरून आपलं दैनंदिन जीवन पूर्ण पासवर्डमय झाल्याचं दिसून येते. पण तुम्हाला माहिती आहे का जगातील पहिला Password कधी आणि कुणी तयार केला आहे? हा पासवर्ड तयार करण्याची गरज का पडली? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया...
'या' व्यक्तीने बनवला आहे जगातील पहिला Password :
अमेरिकेतील MIT विद्यापीठाचे प्राध्यापक फर्नांडो कॉर्बेटो यांनी जगातील पहिला पासवर्ड तयार केला होता. यानंतर जगभर पासवर्ड लोकप्रिय झाला आणि हळूहळू प्रत्येक क्षेत्रात पासवर्डचा वापर होऊ लागला. या पासवर्डच्या शोधाचीही कहानी खूप इंटरेस्टिंग आहे. आता तुम्हाला वाटेल की पासवर्डची का गरज निर्माण झाली असेल? याचं कारण प्रा. फर्नांडो यांनी विद्यापीठातील आपल्या इतर सहकारी संशोधकांसोबत एका कॉम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टमची निर्मिती केली होती. यावर सगळ्यांनाच आपापली कामं करायची होती. यासाठी प्रत्येकाला कॉम्प्युटरवर बसण्यासाठी वेळ हवा होता. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी MIT च्या (Massachusetts Institute of Technology) प्राध्यापकांनी पहिल्यांदा Digital Password तयार केला. यानंतर प्रत्येकाला स्वतंत्र पासवर्ड देण्यात आले. कारण प्रत्येकाला कंम्प्युटरवर बसल्यानंतर आपली फाईल ओपन करून काम करता येऊ शकेल.
पासवर्डचा शोध लावल्यानंतर झाला पश्चाताप :
डिजिटल पासवर्डचा शोध लागल्यानंतर हळूहळू जगभर पासवर्डची लोकप्रियता वाढली होती. मात्र, यालाही लोकांनी पर्याय शोधला आणि हॅकिंगच्या माध्यमातून पासवर्ड चोरी करू लागले. या प्रकारामुळे प्रा. कॉर्बेटो यांना प्रचंड धक्का बसला आणि याचा त्यांना खूप पश्चातापही झाला होता. याचं कारण लोक पासवर्ड हॅक करून चुकीचा वापर करत असल्याचं त्यांच्या लक्षात आले. ही घटना 70 च्या दशकातील आहे. आज तर डिजिटल मीडियाचे जग आहे आणि प्रगत टेक्नॉलॉजीही आहे. त्यामुळे आता तर ऑनलाईन हॅकिंगचे खूप प्रकार वाढले आहेत. या हॅकर्सची नेहमी तुमच्या डेटा आणि बँक बॅलेंसवर लक्ष असते.
1946 मध्ये फर्नांडो यांनी नौदलातील नोकरी सोडली होती. यानंतर कॅलिफोर्निया येथील एका विद्यापीठात प्रवेश घेतला आणि पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. यानंतर त्यांनी 1956 मध्ये MIT विद्यापीठातून फिजिक्स विषयातून पीएचडी प्राप्त केला आणि याचं विद्यापीठात ते प्राध्यापक म्हणून सेवा द्यायला सुरूवात केली. यानंतर याचं त्यांनी डिजिटल पासवर्डचा शोध लावला होता. त्यांनी निवृत्त होईपर्यंत MIT विद्यपीठात एक शिक्षक म्हणून प्रामाणिक सेवा दिली आहे.
इतर बातम्या वाचा :
Strong Password : पासवर्ड वारंवार हॅक होतोय? स्ट्रॉंग पासवर्डसाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स