एक्स्प्लोर
टीम इंडियाच्या फिल्डिंग कोच पदासाठी जॉन्टी ऱ्होड्स यांचा अर्ज
दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटर जॉन्टी ऱ्होड्स यांनी टीम इंडियाच्या फिल्डिंग कोच पदासाठी बीसीसीआयकडे अर्ज दाखल केला आहे.

Getty Images
मुंबई : दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटर जॉन्टी ऱ्होड्स यांनी टीम इंडियाच्या फिल्डिंग कोच पदासाठी बीसीसीआयकडे अर्ज दाखल केला आहे. ऱ्होड्स हे या पदासाठी अर्ज दाखल करणारे सर्वात हाय प्रोफाईल व्यक्ती आहेत. ऱ्होड्स यांनी स्वतः एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत याबाबत माहिती दिली आहे.
ऱ्होड्स यांनी सांगितले की, मी भारतीय संघाच्या फिल्डिंग कोच पदासाठी अर्ज केला आहे. मला आणि माझ्या पत्नीला भारत देश खूप आवडतो. आमचे या देशावर खूप प्रेम आहे. या देशाने याआधी मला खूप काही दिलं आहे. आमच्या दोन्ही मुलांचा जन्मदेखील याच देशात झाला आहे.
ऱ्होड्स हे त्यांच्या जमान्यातील जगातले सर्वश्रेष्ठ फिल्डर म्हणून ओळखले जात होते. आजही जगभरातले अनके उत्तम फिल्डर्स ऱ्होड्स यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतात. 1992 सालच्या विश्वचषकामध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम उल हक याला धावबाद करणे, हा ऱ्होड्स यांच्या कारकिर्दीतला सर्वात मोठा क्षण मानला जातो. 49 वर्षी ऱ्होड्स यापूर्वी आयपीएलमधील मुंबई इंडियन्स या संघाचे फिल्डिंग कोच होते.
बीसीसीआयने टीम इंडियाच्या वेगवेगळ्या प्रशिक्षक पदांसाठी अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले आहे. ज्यामध्ये मुख्य प्रक्षिक्षक, फलंदाजी प्रक्षिक्षक, गोलंदाजी प्रक्षिक्षक आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक या पदांचा समावेश आहे. 30 जुलैपूर्वी अर्ज दाखल करण्याचे बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे.
आर. श्रीधर सध्या टीम इंडियाचे सध्याचे फिल्डिंग कोच (क्षेत्ररक्षण प्रशिक्षक)आहेत. प्रक्षिक्षक पदावरील श्रीधर यांचा कालावधी संपुष्टात आला होता. परंतु टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी त्यांना 45 दिवसांचा कालावधी वाढवून देण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बातम्या
मुंबई
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
