EURO Cup 2024 Romania vs Netherlands: रोमानियाविरुद्ध नेदरलँडचा 3-0 ने विजय; यूरो कप 2024 च्या उपांत्य फेरीत नेदरलँडचा प्रवेश
EURO Cup 2024 Romania vs Netherlands: नेदरलँडने यूरो कप 2024 च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
EURO Cup 2024 Romania vs Netherlands: डोनीएल मालेने केलेल्या दोन गोलच्या सहाय्याने 2008 नंतरच्या पहिल्या युरो उपांत्यपूर्व फेरीत नेदरलँडने स्थान निश्चित केले. नेदरलँडने शेवटच्या-16 सामन्यात रोमानियाचा 3-0 असा पराभव केला. या विजयासह यूरो कप 2024 च्या उपांत्य फेरीत नेदरलँडने प्रवेश केला आहे. नेदरलँडचा संघ अंतिम आठमध्ये तुर्की किंवा ऑस्ट्रियाशी खेळेल.
Late Malen double seals Dutch win 🇳🇱👏#EURO2024 | #ROUNED pic.twitter.com/nt1aSV5JRE
— UEFA EURO 2024 (@EURO2024) July 2, 2024
नेदरलँडच्या कोडी गॅकपोने पहिल्या हाफमध्ये आघाडी मिळवून दिली होती. रोमानियाच्या खेळाडूंनी गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र नेदरलँडच्या खेळाडूंनी हे हाणून पाडत 3-0 अशा फरकाने विजय मिळवला. कोडी गॅकपोला या सामन्याचा सामनावीर म्हणून पुरस्कार देण्यात आला.
Goal and an assist in the round of 16 🦁@Vivo_GLOBAL | #EUROPOTM pic.twitter.com/oR3kAtZd2V
— UEFA EURO 2024 (@EURO2024) July 2, 2024
फ्रान्सचाही उपांत्य फेरीत प्रवेश
यूरो कपच्या उपांत्यपूर्व फेरीत फ्रान्सनं अटीतटीच्या लढतीत बेल्जियमवर 1-0 असा विजय मिळवत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत आता फ्रान्स आणि पोर्तुगाल यांच्यात लढत होईल. याशिवाय स्पेन विरुद्ध जर्मनी, इंग्लंड विरुद्ध स्वित्झरलँड यांच्यासह आणखी दोन संघांमध्ये लढती होती. यूरो कपच्या राऊंड 16 मधून फ्रान्सनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
संबंधित बातम्या :
EURO 2024: यूरो कपमध्ये जॉर्जियाने इतिहास रचला; पोर्तुगालचा 2-0 ने केला पराभव