एक्स्प्लोर

EURO 2024: यूरो कपमध्ये जॉर्जियाने इतिहास रचला; पोर्तुगालचा 2-0 ने केला पराभव

Georgia vs Portugal Euro 2024: जॉर्जियाने या विजयासह अंतिम-16 मध्ये प्रवेश केला आहे.

EURO 2024: यूरो कपची रंगत आता वाढू लागली आहे. यूरो कपमध्ये एकूण 24 संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येक गटात  4 संघ या प्रमाणं 6 गटांमध्ये त्यांची विभागणी करण्यात आली आहे. जर्मनीत खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेत रोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. यावेळी 24 संघांनी युरो कप 2024 मध्ये भाग घेतला आहे. आज जॉर्जिया आणि पोर्तुगाल यांच्यात युरो कपचा 35 वा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात जॉर्जियाने पोर्तुगालला 2-0 ने  पराभूत केले. जॉर्जियाने या विजयासह अंतिम-16 मध्ये प्रवेश केला आहे.

जॉर्जियाचा विजय ऐतिहासिक आहे, 1991 मध्ये सोव्हिएत युनियनपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची त्यांची सर्वात मोठी उपलब्धी आहे. जागतिक क्रमवारीत 74व्या क्रमांकावर असलेल्या जॉर्जियाने सहाव्या क्रमांकाच्या पोर्तुगालवर मात केली. जॉर्जियाचा इथपर्यंतचा प्रवास खडतर होता, कारण ते त्यांच्या पात्रता फेरीत चौथ्या स्थानावर होते. मात्र आज पोर्तुगालविरुद्ध विजय मिळवत जॉर्जियाने इतिहास रचला आहे. जॉर्जियाने गट एफमध्ये आता तिसरे स्थान पटकावले आहे. जॉर्जियाचा अंतिम-16 मध्ये पुढील सामना तीन वेळा युरो जेतेपद जिंकणाऱ्या स्पेनसोबत होणार आहे.

ग्रुप डी मध्ये ऑस्ट्रिया अव्वलस्थानी

ग्रुप डी मध्ये ऑस्ट्रिया, फ्रान्स, नेदरलँडस, पोलंड या संघांचा समावेश आहे. ऑस्ट्रियानं नेदरलँडसला 3-2 गोलनं पराभूत केलं. यासह ऑस्ट्रियानं फ्रान्सला ग्रुप डी मध्ये पिछाडीवर टाकलं आहे. ऑस्ट्रियाकडे आता 6 गुण आहेत. तर, फ्रान्सकडे 5, तर नेदरलँडकडे 4 आणि पोलंडकडे 1 गुण आहे. ऑस्ट्रियानं दोन मॅच जिंकल्या आहेत. तर, फ्रान्सनं एक मॅच जिंकली तर त्यांच्या दोन मॅच ड्रॉ झाल्या.  ऑस्ट्रिया ग्रुप डी मध्ये पहिल्या स्थानावर पोहोचलं आहे. आता त्यांची लढत ग्रुप एफ मधील दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघासोबत होईल. ग्रुप एफमधून तुर्की, जॉर्जिया आणि झेक रिपब्लिक या पैकी एखादा संघ ग्रुप एफमध्ये दुसऱ्या स्थानी असेल. 

संबंधित बातम्या : 

EURO 2024 : फ्रान्सचा कॅप्टन किलियन एमबाप्पेचं नाक फुटलं पण लढत राहिला, ऑस्ट्रियाला 1-0 नं पराभूत करुनच थांबला 

EURO 2024 : पोर्तुगालचा झेक रिपब्लिकवर 2-1 नं नाट्यमय विजय,रोनाल्डोनं किती गोल केले? 

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Satara ZP Election Result : साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, भाजप विरोधी बाकांवर?
साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, सेना किंगमेकर  
BCCI Central Contract : टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं काय झालं? 
टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित आणि विराटचं काय?
Satej Patil: 'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना २०२६चा राजरत्न पुरस्कार घोषित
एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना २०२६चा राजरत्न पुरस्कार घोषित

व्हिडीओ

ZP Election Result : जिल्हा परिषद निवडणुकीत मराठवाड्यात कुणाचा गुलाल, कोण बेहाल? Special Report
Pashchim Maharashtra Elecction : पश्चिम महाराष्ट्रात झेपीचा कारभारी कोण? Special Report
ZP konkan Result : जिल्हा परिषदेत सिंधुदुर्ग राणेंचो, रत्नागिरी सामंतांची Special Report
Political Family Result : घराणेशाहीचा कुठे जय, कुठे पराजय? Special Report
Pashchim Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रात झेपीचा कारभारी कोण? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara ZP Election Result : साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, भाजप विरोधी बाकांवर?
साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, सेना किंगमेकर  
BCCI Central Contract : टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं काय झालं? 
टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित आणि विराटचं काय?
Satej Patil: 'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना २०२६चा राजरत्न पुरस्कार घोषित
एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना २०२६चा राजरत्न पुरस्कार घोषित
फॉर्च्यूनरचा चेंदामेंदा, पुण्याहून गुजरातला निघालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू संभाजी पाटीलचा अपघाती मृत्यू
फॉर्च्यूनरचा चेंदामेंदा, पुण्याहून गुजरातला निघालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू संभाजी पाटीलचा अपघाती मृत्यू
दोन शिवसेना एकत्र आलेल्या बार्शीत भाजपची जोरदार मुसंडी; राजेंद्र राऊतांकडून व्हाईट वॉश, सोपलांचा मोठा पराभव
दोन शिवसेना एकत्र आलेल्या बार्शीत भाजपची जोरदार मुसंडी; राजेंद्र राऊतांकडून व्हाईट वॉश, सोपलांचा मोठा पराभव
ZP Eelction results: झेडपी निवडणुकीत अजित दादांच्या राष्ट्रवादीचा मोठा विजय, पुण्यातही सर्वाधिक जागा; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया
झेडपी निवडणुकीत अजित दादांच्या राष्ट्रवादीचा मोठा विजय, पुण्यातही सर्वाधिक जागा; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 फेब्रुवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 फेब्रुवारी 2026 | सोमवार
Embed widget