WTC Final Scenario : भारताचं नशीब पाकिस्तानच्या हाती, WTC फायनल समीकरण झालं किचकट, टीम इंडिया जाणार पहिल्या क्रमांकावर?
WTC Final Scenario : भारत व पाकिस्तान या दोन्ही देशातील क्रिकेट सामने हे हायहोल्टेज असतात.
WTC Final Scenario 2025 : भारत व पाकिस्तान या दोन्ही देशातील क्रिकेट सामने हे हायहोल्टेज असतात. या दोन्ही देशांतील क्रिडा रसिकच नाही, तर संपूर्ण जगाचे या सामन्याकडे लक्ष असते. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये दोन्ही संघ कधीही भिडले नाहीत, परंतु अंतिम फेरीच्या शर्यतीत त्यांचे सामने महत्त्वाचे ठरले आहेत. ज्या दिवशी भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथा कसोटी सामना खेळणार आहे, त्याच दिवशी पाकिस्तानचा संघ दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जिंकले तर WTC पॉइंट टेबलमध्ये उलथापालथ होण्याची खात्री आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम शर्यतीपूर्वी आपण सर्व संघांची गुणतालिकेतील स्थिती जाणून घेऊया. दक्षिण आफ्रिका गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया आहेत. चौथ्या क्रमांकावर न्यूझीलंड आणि पाचव्या क्रमांकावर श्रीलंका आहे. इंग्लंड सहाव्या, पाकिस्तान सातव्या, बांगलादेश आठव्या आणि वेस्ट इंडिज नवव्या क्रमांकावर आहे.
टीम इंडिया जाऊ शकते पहिल्या क्रमांकावर?
मेलबर्नमध्ये जर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला हरवले आणि पाकिस्ताननेही अपसेट केला, तर पॉइंट टेबलमध्ये मोठा बदल होऊ शकतो. जर भारताने बॉक्सिंग डे कसोटी सामना जिंकला तर गुणतालिकेत त्याचे गुण 55.88 वरून 58.33 (PCT) पर्यंत वाढतील. यासह ऑस्ट्रेलियाचा संघ 58.89 वरून 55.21 गुणांनी कमी होईल. त्याचप्रमाणे पाकिस्तानने जिंकल्यास दक्षिण आफ्रिकेचे गुण 63.33 वरून 57.58 पर्यंत कमी होतील.
हे स्पष्ट आहे की केवळ दोन कसोटी सामन्यांचे निकाल डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये उलथापालथ करू शकतात. हे असे निकाल आहेत जे अजिबात अशक्य नाहीत. पर्थमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. ब्रिस्बेन कसोटी अनिर्णित राहिली. तर दुसरीकडे एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. अशा परिस्थितीत पाकिस्तानने कसोटी सामनाही जिंकला तर नवल वाटायला नको.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथी कसोटी आणि दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील पहिली कसोटी 26 डिसेंबरपासून खेळवली जाणार आहे. हे सामने नियोजित 5 दिवस सुरू राहिल्यास ते 30 डिसेंबर रोजी संपतील. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाला 5 कसोटी सामने खेळायचे आहेत. पाचवी कसोटी पुढील वर्षी जानेवारीत सिडनी येथे खेळवली जाणार आहे.
हे ही वाचा -