एक्स्प्लोर

Year Ender: विराट कोहली ते रोहित शर्माची टी 20 मधून 'या' भारतीय क्रिकेटपटूंनी घेतली निवृत्ती, विदेशी क्रिकेटपटूंनी देखील केलं बायबाय  

Year Ender 2024: 2024 मध्ये अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. रोहित शर्मा अन् विराट कोहलीनं टी  20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.  

Year Ender 2024 Cricketers Retirement नवी दिल्ली : 2024 या वर्षात क्रिकेट चाहत्यांसाठी जितकं चांगलं राहिलं तितकंच दु:ख देणारं राहिलं. कारण दिग्गज क्रिकेटपटूंनी क्रिकेटला बाय बाय केलं. भारतानं टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानं देशातील कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांना आनंदाचे क्षण अनुभवायला मिळाले. मात्र, त्याचवेळी रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा या सारख्या दिग्गजांनी टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळं क्रिकेट चाहत्यांना देखील धक्का बसला. 2024 मध्ये कोणत्या कोणत्या क्रिकेटपटूंनी निवृत्ती घेतली ते जाणून घेऊयात. 

2024 मध्ये आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्यांमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली यांच्या नावाचा समावेश आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर निवृत्ती जाहीर केली. विराट कोहली आणि रोहित शर्मा नंतर ऑलराऊंडर टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.  

भारतीय क्रिकेट संघाच्या इतर क्रिकेटपटूंनी देखील निवृत्ती जाहीर केली. यामध्ये सलामीवीर शिखर धवन, विकेटकीपर दिनेश कार्तिक, विकेटकीपर रिद्धीमान साहा यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. निवृत्तीनंतर शिखर धवन नेपाळ प्रीमियर लीगमध्ये खेळतोय. दिनेश कार्तिकनं निवृत्तीनंतर आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा फलंदाजी प्रशिक्षक आणि मेंटॉर म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे.  

कोणत्या विदेशी खेळाडूंनी निवृत्ती घेतली  

भारतीय क्रिकेटपटूंशिवाय विदेशी खेळाडूंनी देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू डेविड वॉर्नरनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज  जेम्स अँडरसननं देखील निवृत्ती घेतली. आयपीएलच्या 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये देखील अँडरसनचं नाव होतं, मात्र त्याला कोणत्या टीमनं खरेदी केलं नाही.  

इंग्लंडचा ऑलराऊंडर मोईन अली, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज नील वॅगनर आणि टीम साऊथीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीर आणि इमाद वसीम यानं  2024 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. दोन्ही खेळाडूंनी यापूर्वी देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. दोघांनी देखील टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं होतं.

इतर बातम्या :

Tim Southee : कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळणाऱ्या गोलंदाज टीम साऊथीनं केला षटकारांचा भीम पराक्रम; थेट गेलची बरोबरी, कॅलिसला पछाडले!

India vs Australia 3rd Test : गाबा कसोटीत पहिला दिवस पावसाने वाहून गेला, फक्त 80 चेंडूचा खेळ; पुढील चार दिवस काय होणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
Jalgaon News : आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! शेतकऱ्यांना ऊसाची FRP एकरकमी द्या, हायकोर्टाचे सरकारला आदेश; जुना निर्णय रद्द
मोठी बातमी! शेतकऱ्यांना ऊसाची FRP एकरकमी द्या, हायकोर्टाचे सरकारला आदेश; जुना निर्णय रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8 PM TOP Headlines 8PM 17 March 2025Ajit Pawar on Ladki Bahin Yojana | 'लाडकी'ची हमी, दुरुस्तीचा उतारा, अजितदादा काय म्हणाले?Job Majha | PM इंटर्नशिप योजनेत नोकरीची संधी, शैक्षणिक पात्रता काय? किती पदांवर जागा? 17 March 2025100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 17 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
Jalgaon News : आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! शेतकऱ्यांना ऊसाची FRP एकरकमी द्या, हायकोर्टाचे सरकारला आदेश; जुना निर्णय रद्द
मोठी बातमी! शेतकऱ्यांना ऊसाची FRP एकरकमी द्या, हायकोर्टाचे सरकारला आदेश; जुना निर्णय रद्द
'मोदींनी फोन उचलावा आणि आदेश द्यावा; औरंगजेबाच्या कबरीवरुन 'आंदोलनाची नौटंकी' कशाला? आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
'मोदींनी फोन उचलावा आणि आदेश द्यावा; औरंगजेबाच्या कबरीवरुन 'आंदोलनाची नौटंकी' कशाला? आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाल्यानंतर किती दिवसांत रिन्यू करावे? अन्यथा कायमचे बाद
ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाल्यानंतर किती दिवसांत रिन्यू करावे? अन्यथा कायमचे बाद
Ahilyanagar Crime : माझ्याशी बोल नाहीतर तुझी बदनामी करेन, महिलेला धमकी देत पळवून नेलं अन्...; अहिल्यानगरमधील खळबळजनक घटना
माझ्याशी बोल नाहीतर तुझी बदनामी करेन, महिलेला धमकी देत पळवून नेलं अन्...; अहिल्यानगरमधील खळबळजनक घटना
20 विद्यार्थ्यांना फासावर लटकवणार, भारताशेजारील देशाचं टोकाचं पाऊल, नेमकं प्रकरण काय?
20 विद्यार्थ्यांना फासावर लटकवणार, भारताशेजारील देशाचं टोकाचं पाऊल, नेमकं प्रकरण काय?
Embed widget