एक्स्प्लोर

AFG vs AUS अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली, मॅच कुठं फिरवली, जाणून घ्या टर्निंग पॉइंट

AFG vs AUS : अफगाणिस्ताननं टी 20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 च्या लढतीत ऑस्ट्रेलियाला पराभूत करत इतिहास रचला आहे. यामुळं सुपर 8 मधील समीकरणं बदलली आहेत.

सेंट लूसिया :  टी  20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2024) मोठा उलटफेर झाला आहे. ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्ताननं (AUS vs AFG) 21 धावांनी पराभूत करत इतिहास रचला आहे. अफगाणिस्ताननं पहिल्यांदा फलंदाजी करताना 6 विकेटवर 148 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया 127 धावांपर्यंत मजल मारू शकली. अफगाणिस्तानपुढं ग्लेन मॅक्सवेलनं एकाकी झुंज दिली मात्र त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. ग्लेन मॅक्सवेलची (Glane Maxwell) गुलबदीन नैबनं घेतलेली विकेट या मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला.  

ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अफगाणिस्तानचे सलामीवर रहमानुल्लाह गुरबाझ आणि इब्राहिम झदरान या दोघांनी शतकी भागिदारी केली. दोंघांनी अर्धशतकं करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. दोघांनी अफगाणिस्तानला 118 धावांची सलामीची भागिदारी करत मॅचमध्ये पुढं ठेवलं. यानंतर अफगाणिस्तानच्या इतर फलंदाजांना मोठी दावसंख्या उभारता आली नव्हती.  ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी कमबॅक करत अफगाणिस्तानला 148 धावांवर रोखलं.  पॅट कमिन्सनं हॅटट्रिक देखील याच मॅचमध्ये केली.

अफगाणिस्तानपुढं ग्लेन मॅक्सेवलचं वादळ 

ऑस्ट्रेलियाचा आक्रमक सलामीवीर ट्रेविस हेड आज मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. ट्रेविस हेड ला नवीन-उल-हकनं शुन्यावर बाद केलं. यानंतर डेव्हिड वॉर्नर देखील केवळ 3 धावा करुन बाद झाला. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन मिशेल मार्श देखील मोठी धावसंख्या करु शकला नाही. नवीन-उल-हकनं मिशेल मार्शला 12 धावांवर बाद केलं. यानंतर ट्रेविस हेड आणि टीम डेविड देखील लवकर बाद झाले. एका बाजूनं ग्लेन मॅक्सवेलची फटकेबाजी सुरु होती. ग्लेन मॅक्सवेलनं 3 षटकार आणि 6 चौकार मारत 59 धावांची खेळी केली. ग्लेन मॅक्सवेल 2023 च्या वनडे वर्ल्ड कपप्रमाणं ऑस्ट्रेलियाला एकहाती मॅच जिंकवून देणार असं  वाटू लागलं होतं. मात्र, गुलबदीन नैबच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात ग्लेन मॅक्सवेल बाद झाला. नूर अहमदनं ग्लेन मॅक्सवेलचा घेतलेला कॅच गेमचेंजर ठरला. 

ग्लेन मॅक्सवेलची विकेट टर्निंग पॉइंट 

ग्लेन मॅक्सवेल आक्रमक फलंदाजी करत असल्यानं तो एकहाती मॅच जिंकेल, अशी शक्यता निर्माण झालेली होती. याच वेळी राशिद खाननं गुलबदीन नैबला गोलंदाजी दिली.  गुलबदीनच्या बॉलवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मॅक्सवेलनं केला. मात्र, मॅक्सवेलनं मारलेला बॉल थेट नूर अहमदच्या हातात गेला. यानंतर मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स,  एस्टन एगर, अॅडम झाम्पा हे बाद झाले. अफगाणिस्तानच्या गुलबदीन नैबनं 4 तर नवीन उल हकनं 3 विकेट घेतल्या. तर, आझमतुल्लाह ओमरझाई, मोहम्मद नबी आणि राशिद खाननं एक विकेट घेतली. 

संबंधित बातम्या

T20 World Cup 2024 Aus vs AFG: टी20 विश्वचषकात मोठा उलटफेर! अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला लोळवलं; भारतातील बदला वेस्ट इंडिजमध्ये घेतला!

T20 World Cup 2024: सूर्यकुमार यादवने विराट कोहली, रोहित शर्माला टाकलं मागे; केवळ 64 सामन्यात केला भीमपराक्रम

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
''फडणवीसांच्या भाषेत बोलायचं तर, खोटं नेरेटिव्ह पसरवणारं बजेट; अर्थसंकल्पावर ठाकरेस्टाईल टोला
''फडणवीसांच्या भाषेत बोलायचं तर, खोटं नेरेटिव्ह पसरवणारं बजेट; अर्थसंकल्पावर ठाकरेस्टाईल टोला
Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sambhuraj Desai on Vidhan Sabha : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणाVijay Wadettiwar Assembly Session : शेतकऱ्यांवर GST लावला, मध्ये बोलू नका... वडेट्टीवार कुणावर भडकलेCM Eknath Shinde on Drugs : ड्रग्ज संपेपर्यंत कारवाई थांबणार नाही - एकनाथ शिंदेDhananjay Munde on Jayant Patil :शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा, धनंजय मुंडे धावले अनिल पाटलांच्या मदतीला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
''फडणवीसांच्या भाषेत बोलायचं तर, खोटं नेरेटिव्ह पसरवणारं बजेट; अर्थसंकल्पावर ठाकरेस्टाईल टोला
''फडणवीसांच्या भाषेत बोलायचं तर, खोटं नेरेटिव्ह पसरवणारं बजेट; अर्थसंकल्पावर ठाकरेस्टाईल टोला
Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Maharashtra Budget 2024: लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
मुख्यमंत्री लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
Pankaj Jawale : लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?
लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये, अजित पवारांच्या 'बजेट'मधील टॉप 10 घोषणा
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये, अजित पवारांच्या 'बजेट'मधील टॉप 10 घोषणा
Embed widget