एक्स्प्लोर

T20 World Cup 2024 Aus vs AFG: टी20 विश्वचषकात मोठा उलटफेर! अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला लोळवलं; भारतातील बदला वेस्ट इंडिजमध्ये घेतला!

T20 World Cup 2024 Aus vs AFG: आता ऑस्ट्रेलियाला उद्या होणारा भारताविरूद्धचा सामना जिंकावाच लागणार आहे. 

T20 World Cup 2024 Aus vs AFG: टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) आज ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचा (Australia vs Afganistan) सामना झाला. या सामन्यात अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत यंदाच्या विश्वचषकात मोठा उलटफेर केला आहे. सुपर-8 मधील सामन्यात अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा 21 धावांनी पराभव केला आहे. भारतात झालेल्या 2023 च्या वन-डे विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा पराभव केला होता. या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने एकतर्फी खेळी खेळून अफगाणिस्तानला बाहेरचा रस्ता दाखवला होता. आज ऑस्ट्रेलियाचा वेस्ट इंडिजमध्ये पराभव करत अफगाणिस्तानने हा बदला घेतल्याचे बोलले जात आहे. 

प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 149 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ 127 धावांवर सर्वबाद झाला. अफगाणिस्तानकडून गुलाबदिन नायबने 4 विकेट्स, नवीन-उल-हकने 3 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियन संघाने 6 वेळा एकदिवसीय विश्वचषक आणि एकदा टी-20 विश्वचषक जिंकला आहे. आज अफगाणिस्तानने या बलाढ्य संघाचा पराभव केल्याने सर्वत्र कौतुकांचा वर्षाव केला जात आहे. ऑस्ट्रेलियाने आज सामना जिंकला असता, तर उपांत्य फेरीतील आपलं स्थान निश्चित केलं असतं. आता ऑस्ट्रेलियाला उद्या होणारा भारताविरूद्धचा सामना जिंकावाच लागणार आहे. 

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तान संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 148 धावा केल्या. यादरम्यान सलामीवीर गुरबाजने 49 चेंडूंचा सामना करत 60 धावा केल्या. त्याने 4 चौकार आणि 4 षटकार मारले. इब्राहिम झद्रानने 51 धावांची खेळी केली. त्याने 48 चेंडूंचा सामना करताना 6 चौकार मारले. यादरम्यान ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने 3, ॲडम झाम्पाने 2 विकेट्स घेतल्या.

ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानसमोर गुडघे टेकले

अफगाणिस्तानविरुद्ध मैदानात उतरलेल्या दिग्गजांनी भरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने शरणागती पत्करली. ऑस्ट्रेलियन संघ पूर्ण 20 षटकेही खेळू शकला नाही. 19.2 षटकात 127 धावा करून ती ऑलआऊट झाली. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने 41 चेंडूंचा सामना करत 59 धावा केल्या. त्याने 6 चौकार आणि 3 षटकार मारले. कर्णधार मिचेल मार्श 12 धावा करून बाद झाला. मार्कस स्टॉइनिस 11 धावा करून बाद झाला. सलामीवीर ट्रॅव्हिस हेडला खातेही उघडता आले नाही. स्टॉइनिस 11 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मॅथ्यू वेड 5 धावा करून बाद झाला.

अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची दमदार कामगिरी -

अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियालाची चांगलीच कोंडी केली. गुलाबदिन नायबने 4 षटकांत फक्त 20 धावा देत 4 बळी घेतले. नवीन-उल-हकने 4 षटकांत 20 धावा देत . मोहम्मद नबीने 1 षटकात फक्त 1 धाव दिली आणि 1 विकेट घेतली. कर्णधार राशिद खानलाही यश मिळाले. ओमरझाईनेही एक विकेट घेतली.

संबंधित बातम्या:

Gautam Gambhir: 'एक वर्तुळ पूर्ण झालं...'; टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी नाव चर्चेत असताना गौतम गंभीरचं मोठं वक्तव्य

T20 World Cup 2024: सूर्यकुमार यादवने विराट कोहली, रोहित शर्माला टाकलं मागे; केवळ 64 सामन्यात केला भीमपराक्रम

Team India Fixtures 2024-25: टी20 विश्वचषकानंतर टीम इंडिया बांगलादेश, न्यूझीलंड, इंग्लंडविरुद्ध भिडणार; बीसीसीआयने जाहीर केलं वेळापत्रक

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
IND vs SL : सिराज, कृष्णा, गुरनूर ब्रार, आकिब नबी, चारपैकी कोणत्या दोन वेगवान गोलंदाजांना प्लेईंग XI मध्ये संधी? अजिंक्य रहाणेचा महत्त्वाचा सल्ला
श्रीलंकेविरोधातील पहिल्या कसोटीत कोणत्या दोन वेगवान गोलंदाजांना संधी? अजिंक्य रहाणेनं दोघांची नाव सांगितली
Ind vs Afg T20 Series Schedule: श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
Abishek Porel Arrested : मोठी बातमी: IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget