IND Vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू पिंक बॉल कसोटीतून बाहेर, कोण घेणार जागा?
India vs Australia 2nd Test : बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा पहिला सामना भारताने जिंकला आहे. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी कसोटी 6 डिसेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान ॲडलेड ओव्हलवर खेळवली जाणार आहे.
Shubman Gill Injury Ind vs Aus 2nd Test : बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा पहिला सामना भारताने जिंकला आहे. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी कसोटी 6 डिसेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान ॲडलेड ओव्हलवर खेळवली जाणार आहे. रोहित शर्मा पहिल्या कसोटीत खेळला नव्हता आणि शुभमन गिल बोटाला झालेल्या दुखापतीमुळे तो ही बाहेर होता. आता दुसऱ्या कसोटीत रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करेल, पण शुभमन गिल पिंक बॉल कसोटीतून बाहेर जाणार अशी बातमी येत आहे.
🚨Shubman Gill unlikely to play India vs Australia day-night Test in Adelaide, might require two more weeks.🚨 pic.twitter.com/8RFtuWIeIh
— Sujeet Suman (@sujeetsuman1991) November 27, 2024
शुभमन गिलच्या दुखापतीबाबतच्या प्राथमिक अहवालानुसार, त्याला किमान दोन आठवडे विश्रांती घ्यावी लागेल. दुखापतीत सुधारणा झाल्यास तो पहिल्या कसोटीत खेळू शकतो, असे संकेत भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल यांनी दिले होते. मात्र, दुखापत गंभीर असल्याने तसे होऊ शकले नाही.
आता हे स्पष्ट झाले आहे की, शुबमन गिल 31 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान कॅनबेरा येथील मनुका ओव्हल येथे ऑस्ट्रेलियन पीएम इलेव्हन विरुद्धच्या दिवस-रात्र सराव सामन्यातही खेळणार नाही. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ॲडलेडमध्ये होणाऱ्या पिंक बॉल कसोटीच्या तयारीसाठी हा सराव सामना महत्त्वाचा आहे.
टीमशी संबंधित एका सूत्राने टाईम्स ऑफ इंडियाच्या हवाल्याने सांगितले की, "गिलला डॉक्टरांनी 10 ते 14 दिवस विश्रांतीचा सल्ला दिला होता. तो सराव सामन्यात खेळणार नाही आणि ॲडलेड कसोटीतही त्याचा सहभाग संशयास्पद आहे. दुखापतीतून सावरल्यानंतरही त्याला मैदानात उतरण्यापूर्वी चांगल्या सरावाची गरज आहे.
गिलसाठी कोण भरणार?
चार वर्षांपूर्वी गाबा कसोटीत पदार्पणाची शानदार खेळी खेळून भारताला ऐतिहासिक विजय मिळवून देणारा शुभमन गिल आता कसोटी क्रिकेटमधील तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून संघाचा महत्त्वाचा सदस्य बनला आहे. चेतेश्वर पुजाराला पर्याय म्हणून संघ व्यवस्थापनाने गिलला या जागेवर पाठवले. अशा परिस्थितीत दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याच्या अनुपस्थितीत ही जबाबदारी विराट कोहली किंवा केएल राहुल यांच्यावर सोपवली जाऊ शकते.
पर्थ कसोटीत केएल राहुलने जैस्वालसह भारतासाठी सलामी दिली तेव्हा तो त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये होता. पहिल्या डावात त्याने 26 धावा केल्या, तर दुसऱ्या डावात त्याने आपल्या फलंदाजीने 77 धावांची दमदार खेळी केली. त्याने भारताच्या दुसऱ्या डावात यशस्वीसोबत 201 धावांची भागीदारी केली, जी ऑस्ट्रेलियात भारतीय फलंदाजांनी केलेली सर्वोच्च सलामी भागीदारी होती.
हे ही वाचा -