एक्स्प्लोर

Gautam Gambhir on Sarfaraz khan : मुंबईच्या 'त्या' खेळाडूने ड्रेसिंग रूममधील गोष्टी केल्या लीक? गौतमचा स्टार प्लेयरवर 'गंभीर' आरोप

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाला 3-1 असा पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघाने जवळजवळ 10 वर्षांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावसकर ट्रॉफी गमावली.

Gautam Gambhir & Sarfaraz khan : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाला 3-1 असा पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघाने जवळजवळ 10 वर्षांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावसकर ट्रॉफी गमावली. यानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये फूट पडल्याच्या बातम्या समोर आल्या. खरं तर, अलीकडेच भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर म्हणाले होते की, जर खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्यातील चर्चा त्यांच्यापुरती मर्यादित राहिली तर ते संघाच्या वातावरणासाठी चांगले होईल. तसेच, भारतात परतल्यानंतर भारतीय मुख्य प्रशिक्षकांनी या सर्व गोष्टींबाबत बीसीसीआयसोबत आढावा बैठक घेतली.

सर्फराज खानवर खळबळजनक आरोप...

त्याचवेळी, भारतीय संघाचा युवा फलंदाज सर्फराज खानवर एक मोठा आरोप करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी युवा खेळाडू सर्फराज खानवर ड्रेसिंग रूममधील संभाषणे लीक केल्याचा आरोप केला आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी अलीकडेच गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्यासोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत निषेधांसह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. या वृत्तांमध्ये असे म्हटले आहे की, सर्फराज खान ड्रेसिंग रूममधील गोष्टी बाहेरील माध्यमांसोबत शेअर करत होता.

मेलबर्न कसोटीतील पराभवानंतर वातावरण बिघडले?

मेलबर्न कसोटीतील पराभवानंतर गौतम गंभीरने भारतीय खेळाडूंना कडक शब्दांत फटकारले होते. यावेळी, गौतम गंभीरने ड्रेसिंग रूममध्ये चांगला समाचार घेतला होता. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, भारतीय संघातील एक खेळाडू जसप्रीत बुमराहला कर्णधार बनवण्याच्या बाजूने नव्हता. कारण त्याला कर्णधार व्हायचे होते. पण, या खेळाडूचे नाव उघड करण्यात आले नाही. आतापर्यंत गौतम गंभीरने त्यांच्या आरोपांच्या समर्थनार्थ कोणताही पुरावा सादर केलेला नाही.

सर्फराज खानने गेल्या वर्षीच टीम इंडियासाठी पदार्पण केले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करून तो चर्चेत राहिला. पण जेव्हा तो 13 वर्षांचा होता, तेव्हा त्याच्यावर वय चोरण्याचा आरोप झाला. 2011 मध्ये, एका शाळेने सर्फराजवर त्याचे वय चुकीचे दाखवल्याचा आणि तो त्याच्यापेक्षा खूप मोठा असल्याचे सांगण्याचा आरोप केला. यानंतर त्याच्या हाडांचीही तपासणी करण्यात आली. यानंतर, हाडांच्या वयाच्या मूल्यांकनात, त्याचे वय 15 वर्षे असल्याचे आढळून आल. पण, नंतर केलेल्या प्रगत तपासात असे सिद्ध झाले की सर्फराज प्रत्यक्षात 13 वर्षांचा होता. पण या घटनेनंतर सर्फराज खानचा आत्मविश्वास कमी झाला. या धक्क्यामुळे त्याने क्रिकेटमधून ब्रेक घेतला आणि मानसशास्त्रज्ञाची मदतही घेतली. यानंतर तो पुन्हा मैदानात परतला.

हे ही वाचा -

पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Yashwant Varma : 'नोटसम्राट' न्यायमूर्तीं साहेबांच्या बंगल्यात पोत्यानं पैसा जळाला, आता घराबाहेर सुद्धा जळालेल्या नोटांचा खच सापडला
'नोटसम्राट' न्यायमूर्तीं साहेबांच्या बंगल्यात पोत्यानं पैसा जळाला, आता घराबाहेर सुद्धा जळालेल्या नोटांचा खच सापडला
Satara Crime: साताऱ्यातील तरुणांचं घृणास्पद कृत्य, थायलंडमध्ये जर्मन तरुणीच्या शरीराचे लचके तोडले, देशाची मान शरमेने खाली गेली
साताऱ्यातील तरुणांचं घृणास्पद कृत्य, थायलंडमध्ये जर्मन तरुणीच्या शरीराचे लचके तोडले, देशाची मान शरमेने खाली गेली
मोठी बातमी: नागपूर हिंसाचाराचा मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावर सरकार बुलडोझर चालवणार? कुटुंबीयांना नोटीस धाडली
मोठी बातमी: नागपूर हिंसाचाराचा मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावर सरकार बुलडोझर चालवणार? कुटुंबीयांना नोटीस धाडली
Chhaava Box Office Collection Day 38: फक्त काही पावलं अन् 'छावा' बॉलिवूडचा किंग; सर्वात मोठ्या रेकॉर्डपासून 2 कोटी दूर, एकूण कमाई किती?
फक्त काही पावलं अन् 'छावा' बॉलिवूडचा किंग; सर्वात मोठ्या रेकॉर्डपासून 2 कोटी दूर, एकूण कमाई किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 70 : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवरABP Majha Headlines : 7AM Headlines 24 March 2024ABP Majha Marathi News Headlines 630 AM TOP Headlines 630AM 24 March 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्सDevendra Fadnavis : खुर्ची सलामत, तो कोट पचास; फडणवीसांच्या त्या वक्तव्याचा अर्थ काय? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yashwant Varma : 'नोटसम्राट' न्यायमूर्तीं साहेबांच्या बंगल्यात पोत्यानं पैसा जळाला, आता घराबाहेर सुद्धा जळालेल्या नोटांचा खच सापडला
'नोटसम्राट' न्यायमूर्तीं साहेबांच्या बंगल्यात पोत्यानं पैसा जळाला, आता घराबाहेर सुद्धा जळालेल्या नोटांचा खच सापडला
Satara Crime: साताऱ्यातील तरुणांचं घृणास्पद कृत्य, थायलंडमध्ये जर्मन तरुणीच्या शरीराचे लचके तोडले, देशाची मान शरमेने खाली गेली
साताऱ्यातील तरुणांचं घृणास्पद कृत्य, थायलंडमध्ये जर्मन तरुणीच्या शरीराचे लचके तोडले, देशाची मान शरमेने खाली गेली
मोठी बातमी: नागपूर हिंसाचाराचा मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावर सरकार बुलडोझर चालवणार? कुटुंबीयांना नोटीस धाडली
मोठी बातमी: नागपूर हिंसाचाराचा मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावर सरकार बुलडोझर चालवणार? कुटुंबीयांना नोटीस धाडली
Chhaava Box Office Collection Day 38: फक्त काही पावलं अन् 'छावा' बॉलिवूडचा किंग; सर्वात मोठ्या रेकॉर्डपासून 2 कोटी दूर, एकूण कमाई किती?
फक्त काही पावलं अन् 'छावा' बॉलिवूडचा किंग; सर्वात मोठ्या रेकॉर्डपासून 2 कोटी दूर, एकूण कमाई किती?
Kunal Kamra & Eknath Shinde: कुणाल कामराची शिंदे साहेबांवरील टीका जिव्हारी लागली, स्टुडिओ फोडला, मुंबई पोलिसांची शिवसैनिकांविरोधात मोठी कारवाई, दोन नेत्यांना चौकशीलाही बोलावलं
कुणाल कामराचा शो झालेला स्टुडिओ फोडणाऱ्या शिवसैनिकांवर कारवाई, पोलिसांनी 'त्या' दोन नेत्यांना चौकशीला बोलावलं
Kunal Kamra : एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं; शिंदे गटाकडून तक्रार दाखल
एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं; शिंदे गटाकडून तक्रार दाखल
'दोन दिवसांत माफी मागा, नाहीतर थोबाड काळं करू...'; कुणाल कामराविरोधात FIR, शिवसेना आमदाराचा थेट इशारा
'दोन दिवसांत माफी मागा, नाहीतर थोबाड काळं करू...'; कुणाल कामराविरोधात FIR, शिवसेना आमदाराचा थेट इशारा
Pakistan : YouTuber म्हणाला, पाकिस्तानमध्ये औषधेही भारतातून येतात, पाकचे लोक म्हणाले, नमाज अदा करा, अल्लाहताला...
YouTuber म्हणाला, पाकिस्तानमध्ये औषधेही भारतातून येतात, पाकचे लोक म्हणाले, नमाज अदा करा, अल्लाहताला...
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.