Musheer Khan : अरे व्वा! तेंडुलकरचा विक्रम मोडणाऱ्या मुशीर खानसाठी खूशखबर; BCCI मोठा प्लान
मुंबईचा युवा अष्टपैलू खेळाडू मुशीर खान गेल्या एक वर्षापासून क्रिकेटच्या मैदानात चमकदार कामगिरी करत आहे...
India Tour of Australia Musheer Khan : मुंबईचा युवा अष्टपैलू खेळाडू मुशीर खान गेल्या एक वर्षापासून क्रिकेटच्या मैदानात चमकदार कामगिरी करत आहे. दुलीप ट्रॉफीमध्ये पदार्पणात 181 धावांची खेळी करणाऱ्या मुशीरला आता त्याचे बक्षीस मिळू शकते. निवड समिती त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. इंडिया-ए विरुद्ध इंडिया-बी यांच्या दुलीप ट्रॉफी सामन्यात मुशीरने ज्या प्रकारे दबावाखाली फलंदाजी केली आणि 181 धावा केल्या, त्यामुळे निवडकर्ते त्याच्यावर खूप प्रभावित झाले आहेत आणि ते त्याला भारत-अ संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाठवू शकतात.
दुलीप ट्रॉफीमध्ये पदार्पणात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मुशीरने दुसऱ्या टोकाला विकेट पडल्यानंतरही संयम राखला आणि 181 धावा केल्या. त्याचे तिसरे प्रथम श्रेणी शतक आहे. त्याच्या मॅरेथॉन खेळीमुळे इंडिया बी संघाला 94/7 वरून 321 धावा करता आल्या, ज्या सामन्यात निर्णायक ठरल्या आणि इंडिया बी संघाने 76 धावांनी सामना जिंकला.
मुशीर खानसाठी BCCI मोठा प्लान
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता बीसीसीआय ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारत अ संघात मुशीर खानचा समावेश करू शकते. मुशीर खानचा फिटनेस आणि फॉर्म पाहता तो ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध खेळणार हे निश्चित मानले जात आहे. आता आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी बीसीसीआय मुशीरचा संघात समावेश करते की नाही हे पाहायचे आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दोन्ही संघांमध्ये तीन चार दिवसीय कसोटी सामनेही खेळले जाणार आहेत. भारत अ संघ नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. मुशीर खानने रेड बॉल क्रिकेटमध्ये आपल्या उत्कृष्ट कामगिरीने निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. याआधी मुशीरने अंडर-19 वर्ल्डकपमध्येही चमकदार कामगिरी केली होती.
Musheer Khan in the last 5 Domestic Games:
— Saabir Zafar (@Saabir_Saabu01) September 6, 2024
203(157) vs Baroda in the Ranji Trophy QF
33(25) vs Baroda in the Ranji Trophy QF
55(131) vs Tamil Nadu in the Ranji Trophy SF
136(326) vs Vidarbha in the Ranji Trophy Final
181(373) vs India A in the Duleep Trophy #MusheerKhan pic.twitter.com/lPU4ZWcGf7
7 प्रथम श्रेणी सामन्यात 3 शतके
मुशीरने 7 सामन्यांच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत 3 शतके आणि 1 अर्धशतक झळकावले आहे. त्याचा संघ खूप दबावाखाली असताना त्याने दोन शतके ठोकली आहेत. स्विंग होणारा चेंडू नक्कीच त्याची कमजोरी असू शकतो. पण, तो फक्त 19 वर्षांचा आहे आणि तो सुधारू शकतो. मुशीर हा डावखुरा फिरकीपटू असणं त्याच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं, विशेषत: जेव्हा भारताचा एकही आघाडीचा फलंदाज नियमितपणे गोलंदाजी करत नाही.
हे ही वाचा -
Sanju Samson : टीम इंडियातून बाहेर असलेल्या संजू सॅमसनने उचललं मोठं पाऊल, बनला 'या' टीमचा मालक
कोण आहे जास्मिन वालिया?; हार्दिक पांड्यासोबत रंगली डेटिंगची चर्चा, Photo's