![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Prithvi Shaw : पृथ्वी शॉसोबत बाचाबाची करणाऱ्या सपना गिलला पोलिसांनी केली अटक, सेल्फीवरुन झालेला वाद विकोपाला
Prithvi Shaw Sapna Gill : भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉ याचा एका महिलेसोबत बाचाबाची करणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
![Prithvi Shaw : पृथ्वी शॉसोबत बाचाबाची करणाऱ्या सपना गिलला पोलिसांनी केली अटक, सेल्फीवरुन झालेला वाद विकोपाला Mumbai Police Arrested girl sapna gill whos video went viral with Prithvi Shaw Physical fight Prithvi Shaw : पृथ्वी शॉसोबत बाचाबाची करणाऱ्या सपना गिलला पोलिसांनी केली अटक, सेल्फीवरुन झालेला वाद विकोपाला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/16/73a902a71e8c114c189b8d0167881b301676557810487323_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Prithvi Shaw Sapna Gill : भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर खेळाडू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि त्याच्या मित्रांवर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांनी सोशल मीडिया इल्फ्यून्सर सपना गिलला (Sapna Gill) अटक केली आहे. रिपोर्टनुसार, शॉ याच्या मित्रांकडून ओशिवरा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी कारवाई करत आता आरोपीला अटक केली. पृथ्वीसोबत सेल्फी घेण्यावरून वाद इतका वाढला होता की हे प्रकरण हाणामारीवर पोहोचलं. सपना गिल आणि तिच्या साथीदारांनी पृथ्वीवर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आहे.
क्रिकेटर पृथ्वी शॉ वादात एकदा वादात सापडला आहे. त्याचा एका मुलीसोबत हाणामारीचा व्हिडीओ समोर आला आहे. Aaj Tak वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, पृथ्वी शॉवर सपना गिल आणि तिच्या साथीदारांनी हल्ला केला होता. यासोबतच कारच्या काचाही फोडल्या. रिपोर्टनुसार, पोलिसांनी सपना गिलला अटक देखील केली आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असून तिचे इन्स्टाग्रामवर 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
एका पार्टीदरम्यान सपना आणि तिच्या मैत्रिणींनी पृथ्वीकडे सेल्फीची मागणी केली होती. पृथ्वीने पहिल्यांदा सेल्फी काढला. पण दुसऱ्यांदा नकार दिला. यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद इतका वाढला की हाणामारीपर्यंत पोहोचला. या भांडणात पृथ्वीच्या गाडीची काच फुटल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवली असून आता अटकही झाल्याची बातमी समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकूण 7 जणांना आरोपी केले आहे. या प्रकरणी निवेदन देताना पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी वाहनाची तोडफोड करून प्रकरण मिटवण्यासाठी 50 हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार आहे. मात्र आरोपीच्या वतीने कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
पोलिसांनी दाखल केला गुन्हा
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपींनी पृथ्वी शॉच्या मित्राला धमकी दिली की, जर त्याला हे प्रकरण दडपायचे असेल तर त्याला 50 हजार रुपये द्यावे लागतील, जर त्याने तसे केले नाही तर तो त्याला खोट्या प्रकरणात अडकवू. आधारे पोलिसांनी सना गिल आणि शोबित ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींविरुद्ध भादंवि कलम 384,143,148,149,427,504 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे.
पृथ्वी शॉ याचा व्हायरल व्हिडीओ
Hustle video of #Cricketer #Prithvishaw & #influencer #Sapnagill outside Barrel mansion club in vile parle east #Mumbai, it is said that related to click photo with cricketer later whole fight started. @PrithviShaw @MumbaiPolice @DevenBhartiIPS @CPMumbaiPolice @BCCI pic.twitter.com/6LIpiWGkKg
— Mohsin shaikh 🇮🇳 (@mohsinofficail) February 16, 2023
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)