एक्स्प्लोर

Nana Patekar Wife In Chhaava Movie: 'छावा'मध्ये 'या' दिग्गज मराठमोळ्या अभिनेत्याच्या पत्नीनं साकारलीय 'धाराऊ'; नवऱ्यापासून वेगळी राहते, पण...

Nana Patekar Wife In Chhaava Movie: विक्की कौशलच्या 'छावा' चित्रपटात मराठमोळ्या दिग्गज अभिनेत्याच्या पत्नीनं साकारलीय महत्त्वाची भूमिका...

Nana Patekar Wife In Chhaava Movie : विक्की कौशल (Vicky Kaushal) अभिनीत 'छावा' चित्रपट (Chhaava Movie) देशभरात प्रदर्शित झाला आणि त्यानं अख्ख्या जगभरात विक्रम रचला. या चित्रपटाच छत्रपती संभाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj) भूमिका विक्की कौशलनं, तर महाराणी येसुबाईंची (Maharani Yesubai) भूमिका रश्मिका मंदानानं (Rashmika Mandanna) साकारली आहे. तर, मुघल बादशाह औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना (Akshaye Khanna) झळकला आहे. हा चित्रपट ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच चर्चेत होता. पण, चित्रपट रिलीज होताच, याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. 'छावा' चित्रपटात अनेक मराठमोळे कलाकार आहेत. सर्वांच्याच दमदार भूमिका आहेत. अशातच छावा चित्रपटात दिग्गज अभिनेत्याची पत्नी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसून आली आहे. अभिनेते नाना पाटेकर यांच्या पत्नी नीलकांती पाटेकर (Neelkanti Patekar) 'छावा'मध्ये दिसून आल्या आहेत.  

14 फेब्रुवारी रोजी 'छावा' चित्रपट रुपेरी पडद्यावर झळकला. या चित्रपटात विक्की कौशल आणि दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. 'छावा'च्या निर्मात्यांनी चित्रपटातील पहिल्या गाण्याचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये अभिनेते नाना पाटेकर यांच्या पत्नी नीलकांती पाटेकर यांची झलक पाहायला मिळाली होती. त्यानंतर चित्रपटातही त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. 

निर्मात्यांनी 'छावा' चित्रपटातील 'जाने तू' या गाणं सोशल मीडियावर शेअर केलं. या गाण्याचं संगीत ए.आर. रहमान यांनी दिलं आहे आणि अरिजीत सिंहनं गाणं गायलं आहे. 'जाने तू माने' मधील एका दृश्यात, राणी येसूबाई छत्रपती संभाजी महाराज मोहीमेवरुन आल्यानंतर त्यांना ओवाळतानाचं एक दृश्य आहे. यावेळी अनेक महिला येसुबाईंसोबत पाहायला मिळाल्या. यामध्ये नाना पाटेकर यांच्या पत्नी नीलकांती पाटेकर रश्मिकाच्या शेजारी उभ्या असल्याचं पाहायला मिळालं. तेव्हापासूनच नीलकांती पाटेकर यांनी कोणती भूमिका साकारलीय? याच्या चर्चा रंगल्या होत्या. सिनेमा रिलीज होताच, सर्वांना या प्रश्नाचं उत्तर मिळालं, नीलकांती पाटेकर यांनी चित्रपटात धाराऊची भूमिका साकारली आहे.

नीलकांती पाटेकर लक्ष्मण उतेकर यांच्या दिग्दर्शित 'छावा' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत परतल्यात. या चित्रपटात नीलकांती पाटेकर यांनी धाराऊची भूमिका साकारली आहे. दरम्यान, 'छावा' चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी यापूर्वी विकी कौशलसोबत 'जर हटके जरा बचके' या चित्रपटात काम केलं आहे. अशातच 14 फेब्रुवारी रोजी 'छावा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आणि त्यानं जवळपास बॉक्स ऑफिसवर ताबाच मिळवला.  

130 कोटींमध्ये बनलाय 'छावा'

'छावा' मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली बनवण्यात आला आहे. कोई मोईनं दिलेल्या वृत्तानुसार, हा चित्रपट फक्त 130 कोटी रुपयांमध्ये बनवण्यात आला आहे. या चित्रपटानं आपल्या बजेटचा आकडा रिलीजच्या केवळ तीन दिवसांतच गाठला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे, तर विकी कौशलसह रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा आणि विनीत कुमार सिंह हे कलाकार चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहेत.

नीलकांती पाटेकर कोण? 

नीलकांती पाटेकर या मूळच्या पुण्याच्या. त्यांनी पुणे विद्यापीठातून भौतिकशास्त्रात पदवी घेतली. त्यानंतर त्यांना बँकेत नोकरी मिळाली. पण अभिनयाची आवड असल्यामुळे त्या फारकाळ रंगभूमीपासून दूर राहू शकल्या नाही. 1986 मध्ये 'वधाय वधाय मान' या मालिकेतून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पुढच्या तीन वर्षांत, 'आत्मविश्वास' या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. नाना पाटेकर आणि नीलकांती यांची ओळख फार पूर्वीपासूनची.  1978 मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधण्याचं पक्कं केलं आणि विवाहबद्ध झाले. नाना पाटकेरांनी अनेकदा मुलाखतींमध्ये बोलताना, त्यांच्या यशाचं श्रेय नीलकांती पाटेकर यांचंच असल्याचं म्हटलं आहे. पण, काही कारणास्तव ते दोघेही वेगळे राहतात, पण अजूनही दोघांनी घटस्फोट घेतलेला नाही. यापूर्वी नीलकांती पाटेकर 'बर्नी' (2016) या चित्रपटात दिसून आल्या होत्या. ज्यामध्ये त्यांनी आईची भूमिका साकारली होती. 

पाहा व्हिडीओ : विक्की कौशल, रश्मिका मंदानाचा Exclusive Interview

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Chhaava First Weekend Collection: बॉक्स ऑफिसवर 'छावा'चं तुफान; 72 तासांत विक्की कौशलच्याच 10 फिल्म्सचे रेकॉर्ड्स चक्काचूर, फक्त एक पिक्चर पुरून उरला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Khadse : नातीची टवाळखोरांकडून छेडछाड, आजोबा एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप; म्हणाले, गुंडांना स्थानिक लोकप्रतिनिधीचे...
नातीची टवाळखोरांकडून छेडछाड, आजोबा एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप; म्हणाले, गुंडांना स्थानिक लोकप्रतिनिधीचे...
भारत, इंग्लंड, फ्रान्स ते झेलेन्स्की! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 38 दिवसांत पाच राष्ट्रप्रमुखांना जाहीरपणे धमक्या, वादविवाद आणि फटकार; नेमकं यातून साध्य काय होणार?
भारत, इंग्लंड, फ्रान्स ते झेलेन्स्की! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 38 दिवसांत पाच राष्ट्रप्रमुखांना जाहीरपणे धमक्या, वादविवाद आणि फटकार; नेमकं यातून साध्य काय होणार?
Pune News : गोवा-हजरत निजामुद्दीन रेल्वेतून धुर; चार तासांपासून रेल्वे वाहतूक खोळंबली, नेमकं काय झालं?
गोवा-हजरत निजामुद्दीन रेल्वेतून धुर; चार तासांपासून रेल्वे वाहतूक खोळंबली, नेमकं काय झालं?
Rohit Pawar :....पण काही जवळच्या माणसांपासून सावध राहण्याची गरज; छावा चित्रपटाचा दाखला देत रोहित पवारांचं ट्विट, रोख कुणाकडे?
....पण काही जवळच्या माणसांपासून सावध राहण्याची गरज; छावा चित्रपटाचा दाखला देत रोहित पवारांचं ट्विट, रोख कुणाकडे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut PC : एकनाथ शिंदेंनी अमित शाहांकडे फडणवीसांची तक्रार केली, संजय राऊतांचा मोठा दावाShiv Sena BJP त विलीन करा; Amit Shah यांचा Eknath Shinde यांना सल्ला, Sanjay Raut यांचा गौप्यस्फोटDhananjay Munde Resignation : धनजय मुंडे राजीनामा देणार, Karuna Munde यांची  फेसबुक पोस्टKaruna Sharma : Dhananjay Munde यांचा राजीनामा लिहून घेतलाय, 2 दिवसात देतील,करुणा शर्मांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Khadse : नातीची टवाळखोरांकडून छेडछाड, आजोबा एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप; म्हणाले, गुंडांना स्थानिक लोकप्रतिनिधीचे...
नातीची टवाळखोरांकडून छेडछाड, आजोबा एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप; म्हणाले, गुंडांना स्थानिक लोकप्रतिनिधीचे...
भारत, इंग्लंड, फ्रान्स ते झेलेन्स्की! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 38 दिवसांत पाच राष्ट्रप्रमुखांना जाहीरपणे धमक्या, वादविवाद आणि फटकार; नेमकं यातून साध्य काय होणार?
भारत, इंग्लंड, फ्रान्स ते झेलेन्स्की! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 38 दिवसांत पाच राष्ट्रप्रमुखांना जाहीरपणे धमक्या, वादविवाद आणि फटकार; नेमकं यातून साध्य काय होणार?
Pune News : गोवा-हजरत निजामुद्दीन रेल्वेतून धुर; चार तासांपासून रेल्वे वाहतूक खोळंबली, नेमकं काय झालं?
गोवा-हजरत निजामुद्दीन रेल्वेतून धुर; चार तासांपासून रेल्वे वाहतूक खोळंबली, नेमकं काय झालं?
Rohit Pawar :....पण काही जवळच्या माणसांपासून सावध राहण्याची गरज; छावा चित्रपटाचा दाखला देत रोहित पवारांचं ट्विट, रोख कुणाकडे?
....पण काही जवळच्या माणसांपासून सावध राहण्याची गरज; छावा चित्रपटाचा दाखला देत रोहित पवारांचं ट्विट, रोख कुणाकडे?
Raksha Khadse : केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची टवाळखोरांकडून छेडछाड, संत मुक्ताई यात्रेतील धक्कादायक प्रकार
केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची टवाळखोरांकडून छेडछाड, संत मुक्ताई यात्रेतील धक्कादायक प्रकार
Sanjay Raut : एकनाथ शिंदे-अमित शाह यांच्यातील संवाद खरा; सावरकरांची शपथ घेऊन सांगा चर्चा झाली की नाही; संजय राऊतांचं ओपन चॅलेंज
एकनाथ शिंदे-अमित शाह यांच्यातील संवाद खरा; सावरकरांची शपथ घेऊन सांगा चर्चा झाली की नाही; संजय राऊतांचं ओपन चॅलेंज
Himani Narwal : हातावर मेहंदी, गळ्याला ओढणी अन् नाकातून रक्त, काँग्रेस महिला नेत्याच्या हत्येनं खळबळ; राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेत सहभागी
हातावर मेहंदी, गळ्याला ओढणी अन् नाकातून रक्त, काँग्रेस महिला नेत्याच्या हत्येनं खळबळ; राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेत सहभागी
Zelensky meets Starmer in UK : डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी वादाचा कडेलोट होताच झेलेन्स्की पोहोचले इंग्लंडमध्ये; गळाभेट झाली, पीएम स्टार्मर काय म्हणाले?
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी वादाचा कडेलोट होताच झेलेन्स्की पोहोचले इंग्लंडमध्ये; गळाभेट झाली, पीएम स्टार्मर काय म्हणाले?
Embed widget