MS Dhoni: 'या' देशात धोनी साजरा करणार त्याचा 41 वा वाढदिवस, पत्नी साक्षीची सोशल मीडियावर पोस्ट
Happy Birthday MS Dhoni: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी येत्या 7 जुलैला त्याचा 41 वा वाढदिवस साजरा करणार आहे.
Happy Birthday MS Dhoni: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी येत्या 7 जुलैला त्याचा 41 वा वाढदिवस साजरा करणार आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी धोनी इंग्लंडमध्ये पोहचलाय. त्याची पत्नी साक्षीनं स्वत: धोनीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही माहिती दिलीय. धोनी आणि त्याचे कुटुंब सध्या सुट्टीवर आहेत, जिथे ते त्यांचा वाढदिवसही साजरा करणार आहेत, अशी माहिती साक्षीनं पोस्टद्वारे दिलीय.
2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणारा एमएस धोनी आता फक्त आयपीएलमध्ये दिसत आहे. तो इंडियन प्रीमियर लीगमधील चेन्नई सुपर किंग्जचा एक भाग आहे, जिथे त्याला फ्रँचायझीनं 12 कोटी रुपयांमध्ये संघात कायम ठेवलंय. धोनी 2022 मध्येही सीएसकेकडून खेळला होता आणि 2023 मध्येही खेळताना दिसणार आहे. धोनीनं आयपीएलच्या पंधराव्या हंगामापूर्वी रवींद्र जडेजाकडं कर्णधारपद सोपवलं होतं, पण नंतर त्यालाच कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडावी लागली होती.
धोनी गुडघ्याच्या दुखपतीनं त्रस्त
महेंद्रसिंह धोनी गुडघ्याच्या दुपापतीनं त्रस्त असल्याची माहिती आहे. रांचीजवळील एका गावात झाडाखाली बसून डॉक्टरांकडून गुडघ्यांवर उपचार करत आहेत. जंगली औषधी वनस्पतींच्या मदतीनं उपचार करणाऱ्या वैद्य बंधनसिंग खरवार यांनी सांगितले होतं की, प्रत्येक रुग्णाप्रमाणे तेही धोनीकडून औषधाच्या एका डोससाठी 40 रुपये घेतात.
भारतीय संघही लंडनमध्ये
सध्या भारतीय संघ इंग्लंडमध्ये गेल्या वर्षीच्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना खेळत आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय सामने आणि तितक्याच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. येत्या 7 जुलैपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिल्या टी-20 सामन्यात अनेक वरिष्ठ खेळाडूला विश्रांती देण्यात आली आहे. ज्यामुळं अनेक भारतीय खेळाडू धोनीच्या वाढदिवसाला उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे देखील वाचा-