एक्स्प्लोर

MS Dhoni : आयपीएलपूर्वी कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीची मोठी घोषणा, आता नव्या भूमिकेत येणार, चेन्नईच्या चाहत्यांची उत्सुकता वाढली

MS Dhoni : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) एक फेसबुक पोस्ट (Facebook Post) शेअर करत चेन्नईच्या चाहत्यांनी उत्सुकता वाढवली आहे. आयपीएल 2024 (IPL 2024) च्या हंगामात नव्या भूमिकेत येणार असल्याचे संकेत महेंद्रसिंग धोनीने दिले आहेत.

MS Dhoni : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) एक फेसबुक पोस्ट (Facebook Post) शेअर करत चेन्नईच्या चाहत्यांनी उत्सुकता वाढवली आहे. आयपीएल 2024 (IPL 2024) च्या हंगामात नव्या भूमिकेत येणार असल्याचे संकेत महेंद्रसिंग धोनीने दिले आहेत. धोनीची पोस्ट चेन्नईच्या चाहत्यांमध्ये तुफान व्हायरल झाली आहे. दरम्यान, 2024 मध्ये धोनी कशी कामगिरी करणार? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. कदाचित हा धोनीचा शेवटचा आयपीएल हंगाम असू शकतो. 

धोनीने (MS Dhoni) फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, नव्या हंगामासाठी आणि नव्या भूमिकेसाठी वाट पाहू शकत नाही. या पोस्टमधून धोनीने स्पष्ट केले आहे की, तो आगामी आयपीएलमध्ये नव्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे चाहते त्याच्या नव्या भूमिकेबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. 

धोनीच्या नेतृत्वात चेन्नई पाच वेळेस बनली चॅम्पियन 

45 वर्षीय महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र, आयपीएलमध्ये तो सातत्याने खेळत आला आहे. दरवर्षी त्याचा हा शेवटचा हंगाम असेल, असे म्हटले जाते. मात्र, धोनी त्याच ताकदीने मैदानात उतरतो. फिटनेस दाखवतो आणि संपूर्ण हंगाम खेळून काढतो. चेन्नई सुपर किंग्जने धोनीच्या नेतृत्वात तब्बल 5 वेळेस चॅम्पियन बनला आहे. धोनीच्या नेतृत्वातच चेन्नईने 2023 च्या हंगामात दिमाखदार कामगिरी केली होती. चेन्नईने अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव केला होता. 

महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) अंनत अंबानीच्या विवाहापूर्वीच्या सोहळ्यांना हजेरी लावली होती. तो पत्नी साक्षीसमवेत जामनगरमध्ये दाखल झाला होता. चेन्नईचा संघ या वर्षीचा पहिला सामना विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरोधात खेळणार आहे. त्यामुळे खेळाडूंनी मैदानात जोरदार तयारी सुरु केली आहे. 

धोनी राजकारणात एन्ट्री करणार का?

महेंद्रसिंग धोनीच्या फेसबुक पोस्टचे अनेकजण वेगवेगळे अर्थ काढताना दिसत आहेत. काही जणांनी त्याच्या पोस्टचे राजकीय अर्थ काढले आहेत. कारण धोनी नव्या हंगामात नव्या भूमिकेत येणार असे म्हटले. मात्र, कोणत्या क्षेत्रात याबाबतचा उल्लेख पोस्टमध्ये केलेला नाही. त्यामुळे धोनी राजकारणात एन्ट्री करणार का? याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Video : लहानपणीच्या आठवणींमध्ये रमला ऋषभ पंत, लहान मुलांसोबत लुटला गोट्या खेळण्याचा आनंद

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nilesh Ojha : दिशा सालियनसाठी न्याय मागताना ठाकरेंवर बेछूट आरोप करणाऱ्या निलेश ओझांचा वादग्रस्त इतिहास, पाच वर्षांपूर्वी सुप्रीम कोर्टाची आर्थिक दंडासह तीन महिन्यांची शिक्षा
दिशा सालियनसाठी न्याय मागताना ठाकरेंवर बेछूट आरोप करणाऱ्या निलेश ओझांचा वादग्रस्त इतिहास, पाच वर्षांपूर्वी सुप्रीम कोर्टाची आर्थिक दंडासह तीन महिन्यांची शिक्षा
Eknath Khadse: विधानपरिषदेचं कामकाज सुरु झालं तरी एकाही मंत्र्याचा पत्ता नाही, एकनाथ खडसे शंभुराजेंवर संतापले, म्हणाले...
विधानपरिषदेचं कामकाज सुरु झालं तरी एकाही मंत्र्याचा पत्ता नाही, एकनाथ खडसे शंभुराजेंवर संतापले, म्हणाले...
Supreme Court on Cutting Down Trees : झाडं तोडणं माणसाच्या हत्येपेक्षा वाईट, परवानगीशिवाय तोडता येणार नाही; प्रति झाड एक लाख रुपये दंड मंजूर
झाडं तोडणं माणसाच्या हत्येपेक्षा वाईट, परवानगीशिवाय तोडता येणार नाही; प्रति झाड एक लाख रुपये दंड मंजूर
सांगलीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाने पक्षाची सोडली साथ; शिंदेंच्या शिवसेनेत आज होणार पक्षप्रवेश
सांगलीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाने पक्षाची सोडली साथ; शिंदेंच्या शिवसेनेत आज होणार पक्षप्रवेश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Khadse : महत्वाचे प्रश्न एका बाजूला राहिले, दुर्दैवानं पूर्ण अधिवेशन वाया गेलंABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 26 March 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सGold Sliver Rate Drop : सामान्यांसाठी आनंदाची बातमी! सोन्या, चांदीच्या दरात घसरणABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 7AM 26 March 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nilesh Ojha : दिशा सालियनसाठी न्याय मागताना ठाकरेंवर बेछूट आरोप करणाऱ्या निलेश ओझांचा वादग्रस्त इतिहास, पाच वर्षांपूर्वी सुप्रीम कोर्टाची आर्थिक दंडासह तीन महिन्यांची शिक्षा
दिशा सालियनसाठी न्याय मागताना ठाकरेंवर बेछूट आरोप करणाऱ्या निलेश ओझांचा वादग्रस्त इतिहास, पाच वर्षांपूर्वी सुप्रीम कोर्टाची आर्थिक दंडासह तीन महिन्यांची शिक्षा
Eknath Khadse: विधानपरिषदेचं कामकाज सुरु झालं तरी एकाही मंत्र्याचा पत्ता नाही, एकनाथ खडसे शंभुराजेंवर संतापले, म्हणाले...
विधानपरिषदेचं कामकाज सुरु झालं तरी एकाही मंत्र्याचा पत्ता नाही, एकनाथ खडसे शंभुराजेंवर संतापले, म्हणाले...
Supreme Court on Cutting Down Trees : झाडं तोडणं माणसाच्या हत्येपेक्षा वाईट, परवानगीशिवाय तोडता येणार नाही; प्रति झाड एक लाख रुपये दंड मंजूर
झाडं तोडणं माणसाच्या हत्येपेक्षा वाईट, परवानगीशिवाय तोडता येणार नाही; प्रति झाड एक लाख रुपये दंड मंजूर
सांगलीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाने पक्षाची सोडली साथ; शिंदेंच्या शिवसेनेत आज होणार पक्षप्रवेश
सांगलीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाने पक्षाची सोडली साथ; शिंदेंच्या शिवसेनेत आज होणार पक्षप्रवेश
Tomato Price: एका किलो टॉमेटोला फक्त 2 रुपयाचा भाव, हतबल शेतकऱ्याने परडी जमिनीवर ओतली अन् फुकट फुकट ओरडत सुटला
एका किलो टॉमेटोला फक्त 2 रुपयाचा भाव, हतबल शेतकऱ्याने परडी जमिनीवर ओतली अन् फुकट फुकट ओरडत सुटला
IPL 2025 Shreyas Iyer PBKS vs GT: शशांकने 4,4,4,4,4,4  टोलावले, श्रेयस अय्यरचे शतक हुकले; सामना संपताच हात झटकले!
शशांकने 4,4,4,4,4,4 टोलावले, श्रेयस अय्यरचे शतक हुकले; सामना संपताच हात झटकले!
जयकुमार गोरेंच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांचा शरद पवार गटाच्या नेत्यांवर निशाणा; सुप्रिया सुळे अन् रोहित पवारांचे सडेतोड प्रत्युत्तर, म्हणाले...
जयकुमार गोरेंच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांचा शरद पवार गटाच्या नेत्यांवर निशाणा; सुप्रिया सुळे अन् रोहित पवारांचे सडेतोड प्रत्युत्तर, म्हणाले...
कोल्हापूर हद्दवाढी बैठकांवर बैठका; पुन्हा एकदा नव्याने बैठक होण्याची शक्यता
कोल्हापूर हद्दवाढी बैठकांवर बैठका; पुन्हा एकदा नव्याने बैठक होण्याची शक्यता
Embed widget