एक्स्प्लोर

कपिल देव यांच्या प्रयत्नांना यश, माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांना बीसीसीआय 1 कोटी देणार, जय शाहांचे आदेश

BCCI News : बीसीसीआयनं कपिल देव यांच्या प्रयत्नांना दाद देत माजी क्रिकेटर अंशुमन गायकवाड यांच्या उपचारासाठी एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.

मुंबई : टीम इंडियाचे (Team India) महान खेळाडू अंशुमन गायकवाड (Anshuman Gaekwad) कर्करोगाशी  झुंज देत आहेत. अंशुमन गायकवाड यांच्यावरील उपचारासाठी मदत मिळावी, यासाठी माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी बीसीसीआयसोबत (BCCI) पत्र व्यवहार केला होता. कपिल देव यांच्या पत्राची दखल घेत बीसीसीआयनं मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी अंशुमन गायकवाड यांना आर्थिक मदत म्हणून तातडीनं 1 कोटी रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. 

जय शाह यांनी अंशुमन गायकवाड यांच्या कुटुंबीयांशी चर्चा केली आहे. याशिवाय जय शाह  यांनी यावेळी त्याच्या प्रकृतीची माहिती घेतली आणि मदत करण्याचे आदेश बीसीसीआयला दिल्याचं म्हणाले.

अंशुमन गायकवाड यांच्यासाठी कपिल देव यांचे प्रयत्न

अंशुमन गायकवाड यांनी भारतासाठी 40 कसोटी आणि 15 एकदिवसीय सामने खेळले होते. भारताचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी दोन वेळा कामगिरी बजावली आहे.अंशुमन गायकवाड यांच्यावर वर्षभरापासून लंडनच्या किंग्ज कॉलेज रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  अंशुमन गायकवाड यांच्या उपचारासाठी आर्थिक मदत करावी, अशी विनंती कपिल देव यांनी बीसीसीआयकडे केली होती. कपिल देव यांनी त्यांना मिळणाऱ्या पेन्शनची रक्कम द्यायला तयार आहेत, असंही म्हटलं. अंशुमन गायकवाड यांचं सध्याचं वय 71 वर्ष आहे. त्यांच्या सोबत भारताकडून क्रिकेट खेळणाऱ्या सहकाऱ्यांनी निधी उभारणीची मोहीम देखील सुरु केली होती. 

भारताचे प्रशिक्षक म्हणूनही काम

भारतीय क्रिकेट संघासाठी अंशुमन गायकवाड यांनी कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रतिनिधीत्व केलेलं आहे. अंशुमन गायकवाड यांनी भारतासाठी एकूण 40 कसोटी  खेळल्या. 15 एकदिवसीय सामन्यांमध्येही त्यांनी भारताचं प्रतिनिधीत्व केलं. याशिवाय दोन वेळा त्यांनी भारताचे प्रशिक्षक म्हणून देखील काम केलं.  अंशुमन गायकवाड यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून कपिल देव आणि सहकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आलं असून बीसीसीआयनं त्यांना एक कोटींची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. 

संबंधित बातम्या :

यशस्वी-गिलचा झंझावात, झिम्बाब्वेचा दाणादाण, भारताचा 10 विकेटने विजय, मालिकाही खिशात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Jail Gang War : वाल्मिक कराडला बीड कारागृहात गिते गँगकडून चोप, मनोज जरांगेंच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; गृहमंत्र्यांकडे मोठी मागणी
वाल्मिक कराडला बीड कारागृहात गिते गँगकडून चोप, मनोज जरांगेंच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; गृहमंत्र्यांकडे मोठी मागणी
ईद दिवशीच धमाका, भारताचा दुश्मन हाफिज सईदचा खास अब्दुल रहमानचा खात्मा, दहशतवाद्यांच्या फायनान्सरला कराचीमध्ये गोळ्या घातल्या
ईद दिवशीच धमाका, भारताचा दुश्मन हाफिज सईदचा खास अब्दुल रहमानचा खात्मा, दहशतवाद्यांच्या फायनान्सरला कराचीमध्ये गोळ्या घातल्या
Mhada News : म्हाडाचं ठरलं, वर्षभरात 19497 घरं बांधणार, मुंबईत 5199 घरांंचं बांधकाम करणार, 15951.23 कोटींच्या बजेटला मंजुरी
म्हाडा वर्षभरात 19497 घरं बांधणार, मुंबईत 5199 घरांंची निर्मिती करणार, 15 हजार कोटींचं बजेट मंजूर
वाल्मिक कराडला 1-2 चापटा मारल्या, अंजली दमानियांनी सांगितलं बीड तुरुंगात नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराडला 1-2 चापटा मारल्या, अंजली दमानियांनी सांगितलं बीड तुरुंगात नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित महिलेची हत्या?Anjali Damania यांचा संशयSuresh Dhas PC : गिते गँगकडून घुले, वाल्मिक कराडची धुलाई, बीड जेलमधील मारहाणीची इनसाईड स्टोरीGold Price Hike : सोन्याच्या दरात मोठी वाढ! सध्या जीएसटीसह सोन्याचे दर 93 हजार रुपयांवरWalmik Karad News : बीड जेलमध्ये वाल्किक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण- सुरेश धस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Jail Gang War : वाल्मिक कराडला बीड कारागृहात गिते गँगकडून चोप, मनोज जरांगेंच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; गृहमंत्र्यांकडे मोठी मागणी
वाल्मिक कराडला बीड कारागृहात गिते गँगकडून चोप, मनोज जरांगेंच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; गृहमंत्र्यांकडे मोठी मागणी
ईद दिवशीच धमाका, भारताचा दुश्मन हाफिज सईदचा खास अब्दुल रहमानचा खात्मा, दहशतवाद्यांच्या फायनान्सरला कराचीमध्ये गोळ्या घातल्या
ईद दिवशीच धमाका, भारताचा दुश्मन हाफिज सईदचा खास अब्दुल रहमानचा खात्मा, दहशतवाद्यांच्या फायनान्सरला कराचीमध्ये गोळ्या घातल्या
Mhada News : म्हाडाचं ठरलं, वर्षभरात 19497 घरं बांधणार, मुंबईत 5199 घरांंचं बांधकाम करणार, 15951.23 कोटींच्या बजेटला मंजुरी
म्हाडा वर्षभरात 19497 घरं बांधणार, मुंबईत 5199 घरांंची निर्मिती करणार, 15 हजार कोटींचं बजेट मंजूर
वाल्मिक कराडला 1-2 चापटा मारल्या, अंजली दमानियांनी सांगितलं बीड तुरुंगात नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराडला 1-2 चापटा मारल्या, अंजली दमानियांनी सांगितलं बीड तुरुंगात नेमकं काय घडलं?
Video : पालघरमध्ये मुंबई-अहमदाबाद महामार्गावर उड्डाणपुलावरून अचानक राॅकेलचा टँकर थेट 20 फूट खाली कोसळला; जीवाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल
Video : पालघरमध्ये मुंबई-अहमदाबाद महामार्गावर उड्डाणपुलावरून अचानक राॅकेलचा टँकर थेट 20 फूट खाली कोसळला; जीवाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल
Video : नोकरी सरकारी अभियंत्याची, लव्ह मॅरेज केलं; त्याच बायकोला घरीच आशिकसोबत रंगेहाथ पकडलं, बायको अभियंत्याला वायपरने चोपत म्हणाली, तुकडे करून ड्रममध्ये भरेन!
Video : नोकरी सरकारी अभियंत्याची, लव्ह मॅरेज केलं; त्याच बायकोला घरीच आशिकसोबत रंगेहाथ पकडलं, बायको अभियंत्याला वायपरने चोपत म्हणाली, तुकडे करून ड्रममध्ये भरेन!
RBI : गृह कर्ज अन् वाहन कर्ज आणखी स्वस्त होणार? आरबीआय एप्रिलमध्ये 'या' तारखेला पतधोरण जाहीर करणार
घर अन् वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी,आरबीआय व्याज दर घटवणार? पतधोरण 'या' दिवशी जाहीर होणार
लव्ह मॅरेजवाली बायको, मित्राच्या मदतीने उपजिल्हाधिकारी पतीला संपवण्याचा डाव; संभाजीनगर प्रशासनात खळबळ
लव्ह मॅरेजवाली बायको, मित्राच्या मदतीने उपजिल्हाधिकारी पतीला संपवण्याचा डाव; संभाजीनगर प्रशासनात खळबळ
Embed widget