यशस्वी-गिलचा झंझावात, झिम्बाब्वेचा दाणादाण, भारताचा 10 विकेटने विजय, मालिकाही खिशात
यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार शुभमन गिल यांच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर भारताने झिम्बाब्वेचा दहा विकेटनं दारुण पराभव केला.
IND vs ZIM: यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार शुभमन गिल यांच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर भारताने झिम्बाब्वेचा दहा विकेटनं दारुण पराभव केला. या विजयासह भारताने पाच सामन्याच्या कसोटी मालिकेत 3-1 ने आघाडी घेतली आहे. पहिल्या टी20 सामन्यात झिम्बाब्वेने शानदार विजय मिळवला होता. पण त्यानंतर शुभमन गिलच्य युवा संघाने शानदार कामगिरी करत सलग 3 सामने जिंकत मालिका खिशात घातली.
झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करत भारतापुढे 153 धावांचे माफक आव्हान दिले होते. झिम्बाब्वेकडून कर्णधार सिकंदर रझा यानं सर्वाधिक 46 धावांची खेळी केली होती. झिम्बाब्वेने दिलेले 153 धावांचे आव्हान भारताने सहज पार केले. सलामीवीर फलंदाज शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी झंझावाती फलंदाजी करत झिम्बाब्वेच्या गोलंदाजांचा धुराळा उडवला. भारताने हा सामना 10 विकेटने जिंकला. शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी 15.2 षटकत 156 धावांची अभेद्य भागिदारी करत भारताला सहज विजय मिळवून दिला.
यशस्वी जैस्वाल यानं वदळी फलंदाजी करत झिम्बाब्वेची गोलंदाजी फोडून काढली. दुसऱ्या बाजूला शुभमन गिल यानं संयमी फलंदाजी केली. दोघांपुढे झिम्बाब्वेचे गोलंदाज फिके ठरले. यशस्वी जैस्वाल यानं 176 च्या स्ट्राईक रेटने गोलंदाजांची धुलाई केली. यशस्वी जैस्वाल यानं 53 चेंडूमध्ये नाबाद 93 धावांची खेळी साकारली. जैस्वालच्या या खेळीला 2 षटकार आणि 13 चौकारांचा साज होता. तर शुभमन गिल याने कर्णधारपदाला साजेशी फलंदाजी केली. शुभमन गिल याने 39 चेंडूमध्ये 149 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 58 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये गिलने सहा चौकार आणि दोन षटकार ठोकले.
A sparkling 🔟-wicket win in 4th T20I ✅
— BCCI (@BCCI) July 13, 2024
An unbeaten opening partnership between Captain Shubman Gill (58*) & Yashasvi Jaiswal (93*) seals the series for #TeamIndia with one match to go!
Scorecard ▶️ https://t.co/AaZlvFY7x7#ZIMvIND | @ShubmanGill | @ybj_19 pic.twitter.com/xJrBXlXLwM
शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वालच्या झंझावातापुढे झिम्बाब्वेचे गोलंदाज फेल ठरले. सिकंदर रझा याचा एकही रणनिती यांच्यापुढे टिकली नाही. झिम्बाब्वेने सहा गोलंदाजांचा वापर केला, पण एकही विकेट घेण्यात अपयश आले.
भारताने दुसऱ्यांदा इतिहास रचला
टी20 क्रिकेटच्या इतिहासात भारताने दुसऱ्यांदा 10 विकेटने विजय मिळवण्याचा पराक्रम केला आहे. भारताने पहिल्यांदा 2016 मध्ये पहिल्यांदा दहा विकेटने विजय मिळवला होता. त्यावेळीही प्रतिस्पर्धी संघ झिम्बाब्वेच होता. हरारे येथे झालेल्या त्या सामन्यात झिम्बाब्वेनं प्रथम फलंदाजी करताना 99 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरदाखल भारताकडून केएल राहुल आणि मनदीप सिंह यांनी अभेद्य भागिदारी करत विजय मिळवला होता. मनदीपने 52 तर राहुलने 47 धावांची खेळी केली होती. ज शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी 153 धावांच्या आव्हानाचा सहज पाठलाग केला.