(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ind vs Aus 1st Test : बूम बूम बुमराहचा पंजा! पर्थ कसोटीत 104 धावांवर कांगारूंचा खेळ खल्लास, दुसऱ्या डावात भारताकडे 46 धावांची आघाडीवर
फलंदाजांच्या फ्लॉप शोनंतर जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखालील भारतीय गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीमुळे भारताकडे पहिल्या डावात 46 धावांची आघाडी घेतली आहे.
Australia vs India 1st Test : भारतीय क्रिकेट संघाने पर्थ कसोटी सामन्यात शानदार पुनरागमन केले आहे. फलंदाजांच्या फ्लॉप शोनंतर जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखालील भारतीय गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीमुळे भारताकडे पहिल्या डावात 46 धावांची आघाडी घेतली आहे. हिरव्यागार खेळपट्टीवर नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याच्या त्याच्या निर्णय कुठेतरी चुकला होता, पण कर्णधार बुमराहने शानदारपणे पुनरागमन केले. भारताला 150 धावांत गुंडाळल्याचा अभिमान बाळगणाऱ्या कांगारूंना जसप्रीत बुमराह आणि कंपनीने अवघ्या काही तासांतच गुडघे टेकले. कर्णधार जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय वेगवान गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा डाव 104 धावांत गुंडाळला. घरच्या मैदानावर भारताने ऑस्ट्रेलियाला इतक्या कमी धावसंख्येवर बाद करण्याची 43 वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे.
Innings Break!
— BCCI (@BCCI) November 23, 2024
Australia have been bowled out for 104 runs and #TeamIndia secure a 46-run lead. Captain @Jaspritbumrah93 leads by example taking 5 wickets, while debutant Harshit Rana gets 3 and @mdsirajofficial has 2.
It is time for Lunch on Day 2 and post that the Indian… pic.twitter.com/eryt7KsGKf
विकेटवर गवत असूनही बुमराहने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले. कारण या विकेटने गोलंदाजांना सीम आणि एक्स्ट्रा बाउंस दिला. भारताच्या युवा आणि अनुभवी फलंदाजांना यजमान गोलंदाजांचा सामना करता आला नाही. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या नितीश रेड्डीच्या 41 धावा आणि ऋषभ पंतच्या 37 धावा वगळता भारताच्या डावात कोणीही महत्त्वाचे योगदान देऊ शकले नाही. भारतीय संघ 49. 4 षटकांत 150 धावांत गुंडाळले. मिचेल स्टार्कने 11 षटकात 14 धावा देत 2 बळी घेतले. तर जोश हेझलवूडने 13 षटकांत 29 धावा देत 4 बळी घेतले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने दोन गडी बाद केले.
प्रत्युत्तरात कसोटी पदार्पण करणाऱ्या नॅथन मॅकस्विनीला (10) बुमराहने एलबीडब्ल्यू आऊट केले. त्यानंतर बुमराहने उस्मान ख्वाजाची शिकार केली. खराब फॉर्मशी झुंजत असलेला स्टीव्ह स्मिथ (0) पहिल्याच चेंडूवर LBW आऊट झाला. सुरूवातीला बुमराहने दबाव निर्माण केला ज्याचा फायदा इतर गोलंदाजांनाही झाला. मिडल स्टंपवर जाणाऱ्या चेंडूवर राणाने ट्रॅव्हिस हेडची (11) विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाच्या चार विकेट 31 धावांत पडल्या होत्या. लॅबुशेनने खाते उघडण्यासाठी 24 चेंडू खेळले. 52 चेंडूत दोन धावा करून तो सिराजच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू आऊट झाला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने ऑस्ट्रेलियाच्या 7 विकेट्स घेतल्या होत्या. भारताने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा डाव 104 धावांत गुंडाळला.
ऑस्ट्रेलियाला भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहची सर्वात मोठी भूमिका होती. या सामन्यात त्याने 5 विकेट घेतल्या. त्याने स्टीव्ह स्मिथला गोल्डन डक मारण्यास भाग पाडले. बुमराहला सहकारी वेगवान गोलंदाजांची चांगली साथ लाभली. पदार्पणाची कसोटी खेळत हर्षित राणाने 3 बळी घेतले. मोहम्मद सिराजने 2 विकेट्स घेतल्या. या सामन्यात आतापर्यंत पडलेल्या सर्व 20 विकेट वेगवान गोलंदाजांच्या नावावर आहेत. पहिल्या डावात भारताच्या सर्व 10 विकेट ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांनी घेतल्या.