India vs New Zealand 1st Test : बंगळुरूमध्ये पहिल्या दिवशी पावसाचाच खेळ, दुसऱ्या दिवशाची BCCIने बदलली वेळ; जाणून घ्या नवीन अपडेट
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिका अद्याप सुरू झालेली नाही. हा सामना आजपासून म्हणजेच 16 ऑक्टोबरपासून होणार होता, मात्र सततच्या पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.
India vs New Zealand 1st Test 2 Day Update : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिका अद्याप सुरू झालेली नाही. हा सामना आजपासून म्हणजेच 16 ऑक्टोबरपासून होणार होता, मात्र सततच्या पावसामुळे खेळ होऊ शकला नाही. पाऊस अधून मधून थांबला तरी मैदान कोरडे होऊन सामना खेळवता येईल इतका वेळ झाला नव्हता. त्यामुळे पंचांनीही दोन-तीन वेळा मैदानाची पाहणी केली, पण पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. दरम्यान, आता सामन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी वेळेत बदल करण्यात आल्याचे समोर आले आहे. जेणेकरून पहिल्या दिवशी षटकांचे नुकसान काही प्रमाणात कमी करता येईल.
बंगळुरूमध्ये पहिल्या दिवशी होऊ शकले नाही नाणेफेक
भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेच्या पहिल्या दिवशी बुधवारी सकाळी 9 वाजता नाणेफेक होणार होती आणि सामना सकाळी 9.30 वाजता सुरू होणार होता. मात्र दुसऱ्या दिवशी त्यात बदल केला गेला आहे. गुरुवारी सकाळी 9.15 पासून पहिले सत्र सुरू होणार आहे. जे साडेअकरा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. यानंतर दुसऱ्या 5सत्रात म्हणजेच दुपारच्या जेवणानंतर सामना पुन्हा 12.10 वाजता सुरू होईल. हे सत्र दुपारी 2.25 पर्यंत सुरू राहणार आहे. यानंतर दिवसाचे तिसरे आणि शेवटचे सत्र दुपारी 2:45 वाजता सुरू होईल आणि 4:45 पर्यंत चालेल.
🚨 Update from Bengaluru 🚨
— BCCI (@BCCI) October 16, 2024
Day 1 of the 1st #INDvNZ Test has been called off due to rain.
Toss to take place at 8:45 AM IST on Day 2
Start of Play: 9:15 AM IST #TeamIndia | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/RzmBvduPqr
दुसऱ्या दिवशी किमान 98 षटके टाकण्याचा प्रयत्न
सामन्याबाबत असा निर्णय घेण्यात आला आहे की, सामना 15 मिनिटे आधी सुरू होईल आणि त्यानंतर प्रत्येक सत्रात 15 मिनिटे जोडली जातील. कसोटी क्रिकेटमध्ये एका दिवसात सुमारे 90 षटके खेळली जातात. पण भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेतील पहिल्या सामन्यात प्रत्येक सत्रात थोडा वेळ जोडून किमान 98 षटके मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल.
बंगळुरूमध्ये दुसऱ्या दिवशीही पाऊस
गुरुवारी हवामान स्वच्छ असेल तरच दिवसभराचा खेळ होऊ शकेल. सध्या दिवसभर हा खेळ खेळला जाण्याची शक्यता फारच कमी आहे.
दुसऱ्या दिवसाची वेळ
सकाळचे सत्र : 9:15 -11:30 am
दुपारचे सत्र : 12:10 - 1:25
संध्याकाळचे सत्र : 1:45 - 4:45
दोन्ही संघाची प्लेईंग 11 अशी असू शकते...
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह.
न्यूझीलंड संघ : टॉम लॅथम (कर्णधार), ड्वेन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, विल ओ'रुर्के, एजाज पटेल.