India Bowling Coach Sairaj Bahutule : टीम इंडियाच्या बॉलिंग कोचने अचानक दिला राजीनामा! मोठे कारण आले समोर, BCCI अन् राहुल द्रविड यांचे मानले आभार
बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळणारे साईराज बहुतुले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Sairaj Bahutule quits BCCI Centre of Excellence : बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळणारे साईराज बहुतुले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते 2021 पासून गोलंदाजी प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळत होते. साईराज म्हणाले की, वैयक्तिक कारणांमुळे मी पद सोडत आहेत. यावेळी त्यांनी बीसीसीआय, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण यांचे विशेष आभार मानले. साईराज म्हणाले की, त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ अद्भुत होता आणि तो नेहमीच बीसीसीआयसाठी उपलब्ध राहील.
साईराज बहुतुले यांनी दिला राजीनामा!
टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना साईराज म्हणाले की, “हो, मी वैयक्तिक कारणांमुळे सेंटर ऑफ एक्सलन्सचे पद सोडले आहे. मी माजी बीसीसीआय सचिव जय शाह, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा आभारी राहीन, ज्यांनी मला भारतातील सर्व अव्वल फिरकी गोलंदाजांसोबत काम करण्याची संधी दिली. मी भारताच्या 19 वर्षांखालील संघ आणि भारत अ संघासोबत किमान 20 मालिका खेळलो. एनसीएमधील माझा तीन वर्षांचा कार्यकाळ मी खूप एन्जॉय केला. यासोबतच, गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून माझ्या सेवा बीसीसीआयला नेहमीच उपलब्ध असतील.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेत साईराज बहुतुले हे टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षकही होते. याशिवाय, गेल्या दोन अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये ते भारतीय संघाचा गोलंदाजी प्रशिक्षकही होते. गेल्या वर्षी, बहुतुले हे इमर्जिंग आशिया कपमध्ये खेळलेल्या भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. यासोबतच, जेव्हा टीम इंडिया श्रीलंकेत व्हाईट बॉल सिरीज खेळण्यासाठी गेली तेव्हा तो गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून टीम इंडियाशी जोडले होते.
#breaking Former India and Mumbai leg-spinner Sairaj Bahutule has quit the BCCI's Centre of Excellence in Bengaluru due to "personal reasons." Bahutule was the National Cricket Academy bowling coach since Nov 2021.
— Gaurav Gupta (@toi_gauravG) January 31, 2025
2023 मध्ये बॉर्डर-गावसकर मालिकेदरम्यान ते टीम इंडियाचा गोलंदाजी सल्लागारही होते. साईराजने त्याच्या कारकिर्दीत भारतासाठी एकूण दोन कसोटी आणि 8 एकदिवसीय सामने खेळले. या काळात त्याने एकूण 5 विकेट्स घेतल्या. पण, प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्याचा विक्रम प्रभावी होता, त्यांनी 630 विकेट्स घेतल्या आणि 6,176 धावा केल्या.
हे ही वाचा -
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
