एक्स्प्लोर

2100 रुपये याच अर्थसंकल्पात देणार असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलंच नाही : अदिती तटकरे

ख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर (Ladki Bahin Yojana )विधानपरिषदेत वादळी चर्चा सुरु आहे. विरोधी पक्षांकडून या योजनेच्या बाबतीत विविध प्रश्न विचारण्यात येत आहेत.

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर (Ladki Bahin Yojana )विधानपरिषदेत वादळी चर्चा सुरु आहे. विरोधी पक्षांकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब ( Anil Parab),  काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे  यांनी प्रश्न विचारले. तर महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे (Minister Aditi Tatkare) यांनी त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. अनिल परब आणि सतेज पाटील यांनी 2100 रुपयांच्या संदर्भात प्रश्न विचारले असता जाहीरनामा 5 वर्षांचा असतो असं उत्तर अदिती तटकरे यांनी दिलं. आहे 

लाडकी बहीण योजनेबद्दल आम्ही दर दिवशी बोलत असतो. ही लक्षवेधी लाडक्या बहिणींची आहे. किती बहिणी अपात्र होणार आहेत किंवा निकष आधी का लावले गेले नाहीत? असा प्रश्न करत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सरकारला धारेवर धरले. या योजनेसाठी जी तरतूद गरजेचे होती, ती केली गेली का?  पण आता महिलांना अपात्र करत आहात. नमो शेतकरी आणि लाडकी बहीण योजना दोन्हीचा लाभ काही महिला घेत आहेत. म्हणजे सरकारची फसवणूक केली जात आहे. यावर सरकार काय कारवाई करणार असा सवाल देखील परब यांनी उपस्थित केला. सरकार कारवाई करणार का? ज्या अधिकाऱ्यांनी सरकारच्या पैशांचा अपव्यय केला आहे, ते दोन्ही लाभ देऊन त्यांच्यावर काय कारवाई करणार  आहात? असा सवालही त्यांनी केला. अर्थसंकल्पावेळी लाडक्या बहिणांनी 2100 रुपये देऊ अशी घोषणा केली होती, ते 2100 रुपये कधी देणार असा सवालही परब यांनी उपस्थित केला होता. 

नेमकं काय म्हणाल्या अदिती तटकरे?

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या अधिवेशनाच्या कालावधीत किंवा अर्थसंकल्पामध्ये आपण 2100 घोषित करु अशा पद्धतीचं वक्तव्य कुठंही केलं नाही असे अदिती तटकरे म्हणाल्या. राज्य सरकार एखादी योजना जाहीर करत असतो. 100 टक्के देणार, जाहीरनामा हा पाच वर्षांचा असतो, या अर्थसंकल्पात 2100 अशा पद्धतीचं वक्तव्य कुठंही केलेला नाही. जाहीरनामा पाच वर्षांसाठी जाहीर केला जातो. योग्य पद्धतीनं त्यासंदर्भातील प्रस्ताव विभाग म्हणून शासन आणेल. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ ज्यावेळी सूचित करेल त्यावेळी तशा प्रकारचा प्रस्ताव विभाग तयार करेल असे सुळे म्हणाल्या. 

लाडकी बहिण योजना ही महायुती सरकारची सर्वात महत्वाची योजना 

लाडकी बहिण योजना ही महायुती सरकारची सर्वात महत्वाची योजना आहे असं अदिती तटकरे म्हणाल्या. आधीपासून टीका होत राहिली पण महिलांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. 
2 कोटी 63 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. तपासणीची प्रक्रिया ऑगस्टपासून आम्ही सुरुवात केली होती. संजय गांधी निराधार योजनेतील डेटा आम्हाला प्राप्त झाला, त्यात 1 लाख 97 हजार महिलांचा डेटा आला आहे. ही प्रक्रिया सुरु होती म्हणून तसे अर्ज झाले तसा डेटा प्राप्त होत गेला. सप्टेंबरमध्ये जेव्हा अर्ज भरले गेले तेव्हा 2 लाख 54 हजार निराधार योजनेचा डेटा आम्हाला मिळाला असल्याचे अदिती तटकरे म्हणाल्या. ऑक्टोबर डिसेंबरमध्ये आचारसंहिता होती म्हणून तपासणी प्रक्रिया बंद होती. डेटा आम्ही स्वतः परस्पर करत नाही. इतर विभागाकडून आम्हाला डेटा येतो असेही तटकरे म्हणाल्या. त्या त्या पद्धतीने कारवाई करत आम्ही गेलो. 

65 वयानंतरच्या महिला योजनेतून बाद केल्या जातील

लाडक्या बहिणीचा जुलै आणि ऑगस्ट महिन्यात हप्ते काढले होते त्यावेळी देखील निकषात बदल केले नव्हते. स्थानिक पातळीवर आम्हाला जशा तक्रारी आल्या, तशी करवाई आम्ही करत गेलो असे तटकरे म्हणाल्या. RTO  वरुन जो डेटा मिळाला तशी कारवाई केली गेली आहे. जुलैमध्ये 5 लाख महिला अशा होत्या ज्यांचं आधार कार्ड बँकेशी लिंक नव्हते. तेव्हा आपण आधी प्रक्रिया सुरु केली. त्यानंतर महिलांना खात्यात लाभ दिला गेला असेही तटकरे म्हणाल्या. 21 ते 65 वय असणाऱ्या महिलांसाठी ही योजना आहे. 65 नंतरच्या महिला बाद केल्या जातील असेही तटकरे म्हणाल्या. 

महत्वाच्या बातम्या:

Ladki Bahin Yojana : 1500 की 3000 ? लाडक्या बहिणींना मार्च महिन्यात नेमके किती रुपये मिळणार? आदिती तटकरेंनी समोर येऊन संभ्रम केला दूर!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Kandivali : साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी

व्हिडीओ

Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Kandivali : साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कला केंद्रातील दिपाली विवाहित, दोन मुलांची आई; नर्तिका मृत्यूप्रकरणी A टू Z माहिती, आरोपीचे राष्ट्रवादी कनेक्शनही समोर
कला केंद्रातील दिपाली विवाहित, दोन मुलांची आई; नर्तिका मृत्यूप्रकरणी A टू Z माहिती, आरोपीचे राष्ट्रवादी कनेक्शनही समोर
Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी घेतला राज ठाकरेंच्या नातवाचा गालगुच्चा, नंतर फोटोही काढला
पंतप्रधान मोदींनी घेतला राज ठाकरेंच्या नातवाचा गालगुच्चा, नंतर फोटोही काढला
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
Embed widget