Rachin Ravindra : रचिन रवींद्रनं पाकिस्तानात शतक ठोकलं; इकडं विराट कोहलीची धाकधुक वाढली, ICC टूर्नामेंटमध्ये नव्या किंगचा उदय?
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात रचिन रवींद्रने शतक झळकावले.

South Africa vs New Zealand Champions Trophy 2025 Semifinal : क्रिकेटमध्ये पदार्पणापासून युवा फलंदाज रचिन रवींद्रने न्यूझीलंड संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. त्याने 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये तुफानी फटकेबाजी केली होती. यानंतर आता रवींद्र सध्या सुरू असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्येही शानदार फलंदाजी करत आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात रचिन रवींद्रने शतक झळकावले. हे त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील पाचवे शतक आहे आणि त्याने आयसीसी स्पर्धांमध्ये सर्व शतके झळकावली आहेत, यासह तो आयसीसीचा नवा बॉस बनला आहे. त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याच्या संघासाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
रचिन रवींद्रने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 108 धावांची खेळी खेळली. या शतकासह त्याने एक असा विश्वविक्रम आपल्या नावावर केला, जो रोहित आणि विराट सारख्या महान खेळाडूंच्याही आवाक्याबाहेर होता. खरंतर, रचिन रवींद्रने आयसीसी स्पर्धेत 5 शतके झळकावली आहेत आणि त्याने सर्वात कमी डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. फक्त सचिन आणि रचिन यांनीच वयाच्या 30 व्या वर्षापूर्वी सर्वाधिक आयसीसी एकदिवसीय शतके केली आहेत. दोघांनीही प्रत्येकी 5 शतके केली होती.
Fifth 💯 in ICC tournaments for Rachin Ravindra 🔥#SAvNZ ✍️: https://t.co/dGzPWxoavO pic.twitter.com/4Aoqi9R3ff
— ICC (@ICC) March 5, 2025
रचिन रवींद्रचा रेकॉर्ड
रचिन रवींद्रने फक्त 13 डावांमध्ये 5 शतके केली आहेत. मोठी गोष्ट म्हणजे त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत फक्त पाच शतके आहेत आणि त्याने ती सर्व वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये केली आहेत. 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये त्याने 3 शतके झळकावली आणि आता या फलंदाजाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 2 शतके झळकावली आहेत.
किंग विराट कोहलीचा मोडणार रेकॉर्ड?
रचिन रवींद्र विराट कोहलीचा एक महान विक्रम मोडण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. विराटने आयसीसी एकदिवसीय स्पर्धांमध्ये एकूण 6 शतके झळकावली आहेत, तर रवींद्रने अवघ्या 25 व्या वर्षी 5 शतके झळकावली आहेत. पण, या यादीत सर्वात वरच्या स्थानावर रोहित शर्मा आहे, ज्याने आयसीसी एकदिवसीय स्पर्धांमध्ये एकूण 8 शतके केली आहेत.
Kane Williamson and Rachin Ravindra are building a solid foundation for New Zealand 💪#ChampionsTrophy #SAvNZ ✍️: https://t.co/dGzPWxoavO pic.twitter.com/l8jSYaTD4I
— ICC (@ICC) March 5, 2025
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकापेक्षा जास्त शतके ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रचिन रवींद्रचा समावेश झाला आहे. या शतकासह त्याने विराट कोहलीला मागे टाकले आहे. विराटने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आतापर्यंत फक्त एकच शतक झळकावले आहे तर रवींद्रने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 2 शतके झळकावली आहेत.
केन विल्यमसनसोबत एक विक्रम
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य सामन्यात केन विल्यमसनसह रचिन रवींद्रने एक मोठा विक्रम रचला आहे. दोघांमध्ये 164 धावांची भागीदारी झाली, जी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात न्यूझीलंडसाठीची सर्वोच्च भागीदारी आहे. या सामन्यात रवींद्रने 108 धावांच्या खेळीमध्ये 13 चौकार आणि एक षटकार मारला. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत रचिन रवींद्र आता दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. त्याने 3 डावात 226 धावा केल्या आहेत. त्याच्या पुढे फक्त बेन डकेट आहे, ज्याने या स्पर्धेत 227 धावा केल्या आहेत.
















