Laxman Hake: पुरावे असतील तर कोणालाही सोडू नका; सरपंच हत्याप्रकरणावर लक्ष्मण हाकेंची थेट भूमिका, राजीनाम्यावरही बोलले
Laxman Hake: पुरावा असेल तर धनंजय मुंडेंना (Dhananjay Munde) ही सहआरोपी करा, अशी भूमिका ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी घेतली आहे.

Laxman Hake: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात (Santosh Deshmukh Death Case) आरोपींना फाशी पेक्षा ही कठोर शिक्षा झाली पाहिजे. किंबहुना पुरावा असेल तर निश्चितच कोणालाही सोडू नका, सहआरोपी करा अशी आमची भूमिका असल्याचे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी म्हटले आहे. मात्र, केवळ मीडिया ट्रायल करून कोणालाही आरोपी करता येत नाही, त्यासाठी त्याचे पुरावे सापडावे लागतात आणि एफआयआरमध्ये नाव असावे लागतं, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्याचा दावा देखील हाके यांनी केला आहे.
अशाचत, लक्ष्मण हाकेंनी आता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर बोलताना भूमिका स्पष्ट केली आहे. यात ते म्हणाले की, ज्या पद्धतीने मारहाण आणि हत्या करण्यात आली, तशाप्रकारचे फोटो जर आधी पाहायला मिळाले असते तर यापूर्वीच आम्ही कोणाच्याही राजीनाम्यासाठी मोठं आंदोलन केले असतं, असे लक्ष्मण हाके यांनी धनंजय मुडेंच्या प्रश्नावर उत्तर देताना म्हटलं आहे.
....तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी मोठं आंदोलन केलं असतं- लक्ष्मण हाके
महत्वाचे म्हणजे, आमच्या ओबीसी समाजाच्या मंत्र्याला मीडिया ट्रायलद्वारे धमकावण्याचं काम होत असेल तर या महाराष्ट्रातील ओबीसी आणि बहुजन बांधव ठामपणे त्यांच्या पाठीशी उभा राहील. त्या नेत्याच्या संरक्षणासाठी समाज रस्त्यावर उतरेल, असे सांगत नुकतेच लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना पाठिंबा दिला होता. अशाचत, लक्ष्मण हाकेंनी आता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर बोलताना भूमिका स्पष्ट केली आहे. यात ते म्हणाले की, ज्या पद्धतीने मारहाण आणि हत्या करण्यात आली, तशाप्रकारचे फोटो जर आधी पाहायला मिळाले असते तर यापूर्वीच आम्ही कोणाच्याही राजीनाम्यासाठी मोठं आंदोलन केले असतं, असे लक्ष्मण हाके यांनी धनंजय मुडेंच्या प्रश्नावर उत्तर देताना म्हटलं आहे.
दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांची हत्या (Santosh Deshmukh Death Case) करताना केलेल्या अमानुष अत्याचाराचे फोटो, व्हिडीओ जर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना अगोदर माहित असतील तर त्यांनी त्यांचा राजीनामा आगोदर घ्यायला पाहिजे होता, अशी टीकाही लक्ष्मण हाके यांनी केली आहे.
हमाम में सब नंगे होते है- लक्ष्मण हाके
राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. या महिलेने राज्यपाल आणि विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांना पत्र पाठवून मदतीची याचना केली आहे. यावर बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की, हमाम में सब नंगे होते है. जर जयकुमार गोरे यांचा राजीनामा मागत असतील तर 288 आमदारात एकही आमदार राहू शकणार नाही. असे म्हणत जयकुमार गोरे यांच्यावरील राजीनाम्याच्या मागणीनंतर लक्ष्मण हाके यांचे वादग्रस्त वक्तव्य केलंय.
आमदारकी आणि त्यातून पैसा ही पद्धत सुरू असून यातला कोणता आमदार खांदायला गेला होता का? अशा शब्दात जयकुमार गोरे यांचे समर्थन करताना न्यायालया समोर माफी मागून त्यांना निर्दोष सोडले असेल तर पुन्हा त्यांचा राजीनामा मागणे चुकीचे असल्याचे हाके यांनी सांगितले. मात्र नेत्यांनी सार्वजनिक जीवनात वावरताना आचारसंहिता पाळणे गरजेचे असल्याचे हाके यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या

















