Pradosh Vrat 2025 : मार्च महिन्यातलं पहिलं प्रदोष व्रत नेमकं कधी? जाणून घ्या शिव पूजनाचा शुभ मुहूर्त आणि पारण वेळ
Pradosh Vrat 2025 : शास्त्रानुसार, पहिलं प्रदोष व्रत कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला केलं जातं. आणि दुसरं प्रदोष व्रत शुक्ल पक्षाच्या दिवशी केलं जातं.

Pradosh Vrat 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, भगवान शंकराला (Lord Shiva) समर्पित असं प्रदोष व्रत प्रत्येक महिन्यात दोनदा येते.तसेत, या दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वतीची पूजा केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे. तसेच, आपल्या आयुष्यातील दु:ख दूर होतात.
शास्त्रानुसार, पहिलं प्रदोष व्रत कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला केलं जातं. आणि दुसरं प्रदोष व्रत शुक्ल पक्षाच्या दिवशी केलं जातं. हिंदू पंचांगानुसार, फाल्गुन शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीला भौम प्रदोष व्रत केलं जाणार आहे. हे प्रदोष व्रत मार्च महिन्यातील पहिलं प्रदोष व्रत असणार आहे. हे प्रदोष व्रत नेमकं कधी असणार आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
मार्च महिन्यात भौम प्रदोष व्रत कधी आहे?
हिंदू पंचांगानुसार, फाल्गुन शुक्ल पक्ष त्रयोदशी 11 मार्च रोजी सकाळी 08 वाजून 13 मिनिटांनी सुरु होणार आहे. तर, 12 मार्च रोजी सकाळी 09 वाजून 11 मिनिटांनी हे व्रत समाप्त होणार आहे. उदय तिथीत प्रदोष व्रत 11 मार्च 2025 रोजी मंगळवारच्या दिवशी असणार आहे. या दिवशी मंगळवार असल्या कारणाने याला भौम प्रदोष व्रत म्हणतात.
भौम प्रदोष व्रत शिव पूजन मुहूर्त (Pradosh Vrat Shubh Muhurta)
प्रदोष व्रतात शिव पूजन प्रदोष काळात करणं अत्यंत शुभ मानलं जातं. शिव पूजनाचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 06 वाजून 27 मिनिटांपासून ते रात्री 08 वाजून 53 मिनिटांपर्यंत असणार आहे.
जुळून येणार अनेक शुभ योग
भौम प्रदोष व्रताच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आणि रवि योगाचा शुभ संयोग जुळून येणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, या योगाना अत्यंत शुभ मानलं जातं. मान्यतेनुसार या योगात केलेलं कार्य सफळ होते.
भौम प्रदोष व्रत पारण मुहूर्त
हिंदू धर्म मान्यतेनुसार, प्रदोष व्रताचं पारण पुढच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी करणं शुभ मानलं जातं. भौम प्रदोष व्रताचं पारण 12 मार्च 2025 रोजी सकाळी 06 वाजून 34 मिनिटांनंतर केलं जाणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:




















