एक्स्प्लोर

IND vs SL : भारताच्या फलंदाजांची हाराकिरी, रोहित शर्मा ते शिवम दुबे सगळेच फेल, श्रीलंकेनं 27 वर्षानंतर मालिका जिंकली

IND vs SL : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरी वनडे पार पडली आहे. श्रीलंकेनं भारताला 110 धावांनी पराभूत करत विजय मिळवला आहे.

IND vs SL, कोलंबो:भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका संपली आहे. श्रीलंकेनं (Sri Lanka) पहिल्यांदा फलंदाजी करताना 7 विकेटवर 248 धावा केल्या होत्या. भारतापुढं (Team India) विजयासाठी 249 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र, पहिल्या दोन मॅचप्रमाणं तिसऱ्या वनडेमध्ये भारतीय फलंदाज फिरकी गोलंदाजांपुढं संघर्ष करताना पाहायला मिळाले. भारतीय संघ 138 धावांवर बाद झाल्यानं श्रीलंकेनं तब्बल 110  धावांनी विजय मिळवला. श्रीलंकेपुढं भारतीय संघानं तब्बल 27 वर्षांनी एकदिवसीय सामन्यांची मालिका गमावली आहे.  

भारताचा दारुण पराभव

भारतीय संघ तिसऱ्या वनडेमध्ये पराभूत  झाला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली,रियान पराग आणि वॉशिंग्टनं सुंदर यांनी डावाची चांगली सुरुवात करुन देखील ते मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. शुभमन गिल, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, शिवम बे, कुलदीप यादव यांना 10 धावांचा टप्पा देखील ओलांडता आला नाही. अखेर श्रीलंकेनं तिसऱ्या मॅचमध्ये भारताचा 110 धावांनी पराभव केला. 

रोहित शर्मानं आज 35  धावा केल्या. विराट कोहली 20, रियान पराग 15 तर वॉशिंग्टन सुंदरनं 30 धावा केल्या.  भारताचे इतर फलंदाज दोन अंकी धावसंख्या देखील करु शकले नाहीत. त्यामुळं भारताला 110  धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

श्रीलंकेकडून दुनिथ वेल्लालगेनं 5 विकेट घेत भारताच्या टीमचं कंबरडं मोडलं. श्रीलंकेच्या फिरकीपुढं भारताच्या फलंदाजांना अपयश आलं.  भारतानं तब्बल 27 वर्षानंतर श्रीलंकेविरुद्ध मालिका गमावली आहे. 1997 नंतर पहिल्यांदा श्रीलंकेनं भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकली आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिली मॅच टाय झाली. यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये श्रीलंकेनं भारताला 32  धावांनी पराभूत केलं. तर, तिसऱ्या मॅचमध्ये भारताचा 110  धावांनी पराभव झाला.  

भारताचे फलंदाज तिन्ही सामन्यात श्रीलंकेच्या फिरकीपटूंसमोर संघर्ष करताना पाहायला मिळाले. भारताचा संघ तिन्ही सामन्यात बाद झाला. श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांनी भारताच्या 27 विकेट घेतल्या. वानिंदू हसरंगा, दुनिथ वेल्लालगे, चारिथ असलंका आणि जेफरी वेंडरसे यांनी भारताच्या फलंदाजीला सुरुंग लावला.

श्रीलंकेनं सनथ जयसूर्याच्या मार्गदर्शनात ही पहिला मालिका जिंकली आहे. भारतानं यापूर्वी 1997 मध्ये श्रीलंकेविरुद्ध मालिका गमावली होती. त्या मालिकेत सनथ जयसूर्याला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार देण्यात आला होता. 

संबंधित बातम्या :

Shubman Gill : शुभमन गिलचा पाय बाऊंड्रीला लागल्याचा दावा, श्रीलंका बोर्डानं शेअर केलेल्या फोटोवरुन तर्क वितर्क

IND vs SL : सिराज अन् कुशल मेंडिस भिडले पण कार्यक्रम झाला समरविक्रमाचा, पाहा मैदानावर नेमकं काय घडलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget