एक्स्प्लोर

IND vs SL : सिराज अन् कुशल मेंडिस भिडले पण कार्यक्रम झाला समरविक्रमाचा, पाहा मैदानावर नेमकं काय घडलं?

IND vs SL :  भारत आणि श्रीलंका यांच्यात तिसरी वनडे सुरु आहे. या मॅचमध्ये श्रीलंकेनं चांगली सुरुवात केली होती. तिसऱ्या वनडेत देखील श्रीलंकेनं टॉस जिंकला.  

कोलंबो : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तिसरी वनडे कोलंबोमध्ये सुरु आहे. पहिल्या दोन वनडे प्रमाणं श्रीलंकेनं तिसऱ्या वनडेत देखील टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतासाठी तिसऱ्या वनडेत विजय महत्त्वाचा आहे. तिसऱ्या वनडेत विजय मिळवून मालिकेत बरोबरी करण्याच्या इराद्यानं रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतीय संघ मैदानात उतारला आहे. भारतीय संघात आज रिषभ पंत आणि रियान पराग यांना संधी देण्यात आली. रियान परागनं आजच्या मॅचद्वारे एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. रोहित शर्मानं (Rohit Sharma) आज केवळ एका वेगवान गोलंदाजाला संधी दिली. मोहम्मद सिराज याच्यावर वेगवान गोलंदाजीची धुरा होती. मोहम्मद सिराजनं (Mohammad Siraj) समरविक्रमाची एक विकेट घेतली. मात्र त्यापूर्वी मोहम्मद सिराज आणि कुसल मेंडिस (Kusal Mendis) यांच्यात वाद झाला होता.  

श्रीलंकेच्या  फलंदाजांनी जोरदार सुरुवात केली होती.  भारताकडून मोहम्मद सिराजला वेगवान गोलंदाज म्हणून संघात स्थान देण्यात आलं होतं. आजच्या मॅचमध्ये मोहम्मद सिराज महागडा खेळाडू ठरला. सिराजनं  9 ओव्हरमध्ये 78 धावा दिल्या. या दरम्यान मोहम्मद सिराज श्रीलंकेच्या डावाची 39 वी ओव्हर सुरु होती. श्रीलंकेकडून दमदार फलंदाजी करणारा कुसल मेंडिस बॅटिंग करत होता. या ओव्हरमध्ये सुरुवातीला मोहम्मद सिराज आणि कुसल मेंडिस यांच्यात वादावादी झाली. सिराजनं यानंतर ओव्हरच्या पाचव्या बॉलवर समरविक्रमाला माघारी पाठवलं. समरविक्रमा एक रन देखील करु शकला नाही. सिराजनं त्याला एलबीडब्ल्यू आऊट केलं. 

पंचांनी समरविक्रमाला नॉटआऊट दिलं होतं. रोहित शर्मानं पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेत डीआरएस घेतला. हा निर्णय मोहम्मद सिराजच्या बाजूनं गेला. समरविक्रमा शुन्यावर बाद झाला. 

भारतापुढं 249  धावांचं आव्हान 

श्रीलंकेनं प्रथम फंलदाजी करताना 50 ओव्हरमध्ये 7 विकेटवर 248  धावा केल्या. श्रीलंकेकडून अविष्का फर्नांडो यानं 96  धावा केल्या. तर, पथुम निसांका यानं 45  आणि कुसल मेंडिस यानं 59  धावा केल्या. भारताकडून रियान परागनं 3 विकेट घेत श्रीलंकेला मोठी धावसंख्या उभारु दिली नाही. 

भारताला विजय आवश्यक

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या वनडेत रोहित शर्माच्या टीमला विजय मिळवणं आवश्यक आहे. भारतीय संघ आज विजय मिळवल्यास मालिकेत बरोबरी करु शकतो. भारतानं गेल्या 27 वर्षांमध्ये श्रीलंकेविरुद्ध एकही मालिका गमावलेली नाही. त्यामुळं आजच्या मॅचमध्ये भारताला विजय मिळवणं आवश्यक आहे. 

मोहम्मद सिराज आणि मेंडिसचा वाद, पाहा व्हिडीओ

संबधित बातम्या  :

IND vs SL : फर्नांडो आणि निसांकाची आक्रमक सुरुवात, रियान परागनं डाव पलटवला, भारतापुढं विजयासाठी किती धावांचं आव्हान?

Rohit Sharma : सचिन तेंडुलकरच्या काळातील नकोसा विक्रम, रोहित शर्मावर तशीच वेळ येणार? टीम इंडियाला कोणत्याही स्थितीत जिंकावं लागणार कारण..

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Auqib Nabi Profile : वडील डॉक्टर बनवू इच्छित होते, मित्राने बनवलं भारताचा स्टार; आकिब नबीची काळजाला भिडणारी कहाणी
वडील डॉक्टर बनवू इच्छित होते, मित्राने बनवलं भारताचा स्टार; आकिब नबीची काळजाला भिडणारी कहाणी
Gautam Gambhir Team India : गौतम गंभीरची प्रशिक्षकपद धोक्यात! खेळाडूंसह सपोर्ट स्टाफवर ढकलले अपयश... BCCI नाराज; 'ही' मालिका ठरवणार भवितव्य
गौतम गंभीरची प्रशिक्षकपद धोक्यात! खेळाडूंसह सपोर्ट स्टाफवर ढकलले अपयश... BCCI नाराज; 'ही' मालिका ठरवणार भवितव्य
Team India : बुमराहच्या दुखापतीवरून BCCIमध्ये राडा! खेळाडूंच्या आरोग्याचा खेळखंडोबा करणाऱ्या COEचे पितळ अखेर उघडे, आगरकरांसोबत खोटं बोलले?
बुमराहच्या दुखापतीवरून BCCIमध्ये राडा! खेळाडूंच्या आरोग्याचा खेळखंडोबा करणाऱ्या COEचे पितळ अखेर उघडे, आगरकरांसोबत खोटं बोलले?
Ind vs SL Test Series : श्रीलंका दौऱ्यापूर्वी BCCI चा मोठा निर्णय! संघातून बाहेर असलेल्या मुंबईच्या 2 खेळाडूंना थेट श्रीलंकेला धाडले, नेमकं कारण काय?
श्रीलंका दौऱ्यापूर्वी BCCI चा मोठा निर्णय! संघातून बाहेर असलेल्या मुंबईच्या 2 खेळाडूंना थेट श्रीलंकेला धाडले, नेमकं कारण काय?

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ketan Agrawal Crime Case: सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
Tukaram Mundhe On Saoji Mutton: सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आता आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
Pune Police : गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
Solapur Adinath Sugar factory: सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
Bollywood Actor Jugal Hansraj Struggle Life: कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
Manoj Jarange on Pankaja Munde Dhananjay Munde: पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
Embed widget