Sundar Pichai: गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंकडून पाकिस्तानी ट्रोलरचा 'करेक्ट कार्यक्रम'
IND vs PAK, T20 World Cup 2022: गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी सोमवारी ट्विटरवरून त्यांच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

IND vs PAK, T20 World Cup 2022: गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी सोमवारी ट्विटरवरून त्यांच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. सुंदर पिचाईंनं आपल्या या ट्विटमध्ये भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात काल रंगलेल्या थरारक सामन्याचाही उल्लेख केला. त्यानंतर एका पाकिस्तानी चाहत्यानं सुंदर पिचाई यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. परंतु, सुंदर पिचाईंनं यांचा रिप्लाई पाहून पाकिस्तानी चाहत्याची बोलतीच बंद झाली. सुंदर पिचाईच्या रिप्लाईला मोठा पसंती मिळत आहे. नेटकरी सुंदर पिचाई यांच्या रिप्लाईचा स्क्रीन शॉर्ट सोशल मीडियावर शेअर करत आहे.
सुंदर पिचाई यांनी ट्विटरद्वारे दिवाळीच्या शुभेच्छा देताना म्हटलं की, "दिवाळीच्या शुभेच्छा! आशा आहे की उत्सव साजरा करणार्या प्रत्येकजण आपल्या मित्रांसह आणि कुटुंबासह चांगला वेळ घालवत असेल. शेवटची तीन षटके पाहून मी आज पुन्हा आनंद साजरा केला, काय खेळ आणि काय कामगिरी", अशा शब्दात सुंद पिचाई यांनी भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. सुंदर पिचाई यांच्या या ट्वीटवर पाकिस्तानच्या मुहम्मद शाहजेब नावाच्या युजर्सनं कमेंट त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. या पाकिस्तानी चाहत्यानं सुंदर पिचाई यांना सुरुवातीचे तीन षटक पाहायला पाहिजे होते, असा रिप्लाई दिला. यावर सुंदर पिचाई म्हणाले की, हो पाहिलं...भुवी आणि अर्शदीपनं काय गोलंदाजी केली.
फोटो-
पहिल्या तीन षटकात भारताची खराब फलंदाजी
पाकिस्तानविरुद्ध गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेले भारतीय फलंदाज सुरुवातीचं तीन षटकं संघर्ष करताना दिसले. भारतानं 31 धावांवर रोहित शर्मा, केएल राहुल, सुर्यकुमार आणि अक्षर पटेलच्या रुपात महत्वाचे चार विकेट्स गमावले. याचाच पाकिस्तानी चाहत्यानं त्याच्या ट्विटमध्ये उल्लेख केला होता. परंत, सुंदर पिचाईनं त्याला भारतीय गोलंदाज अर्शदीप सिंह आणि भुवनेश्वर कुमारच्या भेदक गोलंदाजीची आठवण करून दिली.
भारताचे पुढील सामने
भारतीय संघ गुरूवारी नेदरलँड्सविरुद्ध त्यांच्या या स्पर्धेतील दुसरा सामना खेळेल. त्यानंतर भारतीय संघ स्पर्धेतील आपला तिसरा सामना 30 ऑक्टोबर रोजी पर्थमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि त्यानंतर 2 नोव्हेंबरला अॅडलेडमध्ये बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. तर, भारतीय संघ सुपर -12 फेरीतील अखेरचा सामना 6 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध खेळेल.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
